काँग्रेस पक्षाची विधानसभेच्या 288 जागा लढवण्याची तयारी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा वेगळा सूर

काँग्रेस पक्षाची विधानसभेच्या 288 जागा लढवण्याची तयारी, प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा वेगळा सूर

Nana Patole : लोकसभा निवडणुका नुकत्याच पार पडल्या. या निवडणुकांमध्ये अनेक एक्झिट पोलचे अंदाज हवेतच विरले. काँग्रेसला अत्यंत कमी आणि भाजपला सर्वात जास्त जागा दाखवत असताना प्रत्यक्ष निकालात काँग्रेसने मात्र जोरदार मुसंडी मारली आहे. महाराष्ट्रात कांग्रेस एका खासदारावरून 13 खासदारांपर्यंत मजल मारत राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. (Nana Patole ) आता सर्वच राजकीय पक्षांनी विधानसभेच्या निवडणुकांची तयारी सुरु केलीये. (Congress) दरम्यान, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचं एक वक्तव्य समोर आलं आहे. महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाची 288 जागेवर लढण्याची तयारी सुरु झाली असल्याचं सूचक वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. ते भंडाऱ्यात माध्यमांशी बोलत होते.

विधानसभेची तयारी  Salman Khan Threat: वसीम चिकनाला पोलिसांकडून अटक; बिश्नोई गँगचे मराठवाडा कनेक्शन उघड

मी साकोलीचा आमदार आहे. त्यामुळं स्वाभाविक आहे, मला इथं यावं लागतं. इथल्या लोकांचे प्रश्न समजावून घ्यावे लागतात. ते प्रश्न सोडवावे लागतात. मात्र, महाराष्ट्रामध्ये 288 जागांवर काँग्रेसची विधानसभेची तयारी सुरु झाली असल्याचं सूचक वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भंडाऱ्यात केलं आहे. नाना पटोलेंच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरुये. कारण, लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची एकजुट दिसणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय. दरम्यान, महाराष्ट्रात आम्ही सगळीकडं विधानसभेची तयारी चालू केली असल्याचंही नाना पटोले यावेळी म्हणाले आहेत.

साकोली विधानसभा

साकोली विधानसभेत त्यांनी जिल्हा परिषद निहाय कार्यकर्ता आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका केल्या आहेत. दरम्यान, गावात पोहोचल्यानंतर नागरिकांच्याही समस्याही नाना पटोलेंनी जाणून घेतल्या आहेत. सध्या नाना पटोले यांचा दौरा सुरू असून त्यांनी आपला साकोली विधानसभा मतदारसंघ पिंजून काढला आहे. याबाबत त्यांना विचारलं असता त्यांनी साकोलीचं नव्हे तर, महाराष्ट्रातील 288 जागांची विधानसभेची तयारी काँग्रेस करत असल्याचं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

तणावाचं वातावरण मराठवाडा अन् विदर्भासाठी आनंदाची बातमी! छत्रपती संभाजीनगर ते नागपूर विमानसेवा लवकरच सुरू

एका बाजुला काँग्रेसने स्वबळाची भाषा केली असतानाच, दुसरीकडे शिवसेठा ठाकरे गट देखील आगामी विधानसभा निवडणूक 288 जागांवर लढवण्याची शक्यता वर्तवली जातेय. माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आगामी विधानसभा निवडणुकीत 288 जागांवर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी ठेवा, असं उद्धव ठाकरे यांनी आपल्या महाराष्ट्रातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या बैठकीत सर्वांना सूचित केलं आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवरुन उद्धव ठाकरे आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत झाली होती. यावरुन महाविकास आघाडीमध्ये काळ तणावाचं वातावरण देखील पाहायला मिळालं होतं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube