Nana Patole : विरोधकांना भ्रष्ट ठरवण्याचं षडयंत्र फडणवीसांचं, सोमय्यांनी त्यांच्या खूनशी राजकारणाचा बुरखा फाडला
Nana Patole on Devendra Fadnavis : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somayya) यांनी काल मोठा गौप्यस्फोट केला. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीच मला मातोश्रीशी संबंधित कथित भ्रष्टाचार बाहेर काढण्याचे आदेश दिले होते, असं वक्तव्य सोमय्यांनी केलं. त्यांच्या या खुलाशामुळं फडणवीसांवर जोरदार टीका केली जाते. आता कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) फडणवीसांवर टीकास्त्र डागलं. विरोधकांना भ्रष्ट ठरवून बदनाम करण्याचे षडयंत्र रचणारा दुसरं कोणी नाही तर फडणवीसच आहेत, सोमय्यांनीच फडणवीसांच्या कपटी व खूनशी राजकारणाचा बुरखा टराटरा फाडल्याची टीका पटोलेंनी केली.
Pushpa 2: ‘त्रिशूळ, शंख आणि सिंदूर…’; श्रीवल्ली’ नंतर ‘पुष्पा’चा पहिला लूक समोर; पोस्टर रिलीज
पटोले म्हणाले, गेल्या 10 वर्षात भाजपने अत्यंत खालची पातळी गाठत खूनशी व कपटी राजकारण करून विरोधकांना संपण्याचं काम केलं. महाराष्ट्रातील काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांना सरकारी यंत्रणेला हाताशी धरून ब्लॅकमेल केलं. भाजपच्या या खुनशी राजकारणाविरोधात काँग्रेस पक्षाने सातत्याने आवाज उठवला होता. आता सत्य समोर आलं. विरोधकांना भ्रष्ट ठरवून बदनाम करण्याचे षडयंत्र रचणारा दुसरं कोणी नाही तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच आहेत. हे भाजपच्या किरीट सोमय्यांनीच उघड करत फडणवीसांच्या कपटी व खूनशी राजकारणाचा बुरखा टराटरा फाडला आहे, अशी टीका पटोलेंनी केली.
Lok Sabha Election: मंगलदास बांदल यांची उमेदवारी वंचितकडून रद्द, फडणवीसांना भेटणे नडले !
पटोले म्हणाले, सोमय्या हे विरोधी पक्षांच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करायचे. ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या मदतीने त्यांच्यावर कारवाई करण्यास लावायचे. या ब्लॅकमेलिंगला कंटाळून अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश करताच त्यांना संविधानिक पदे मिळाली. याचा फडणवीस हे सूत्रधार आहेत, त्यांच्याच सांगण्यावरूनच आपण काम केलं. उद्धव ठाकरे यांच्या विरोधात कट रचण्याचे आदेशही फडणवीस यांनीच दिल्याचे सोमय्यांनी सांगितलं. त्यामुळं फडणवीसांचा खरा चेहरा जनतेसमोर आला आहे. भ्रष्टाचाराच्या नावाखाली नियोजनबद्ध पद्धतीने रॅकेट चालवण्यात आले आणि हे रॅकेट चालवणारा खलनायक देवेंद्र फडणवीस आहे, हे आता कोणापासून लपून राहिलेले नाही, असं पटोले म्हणाले.
जनता भाजपला घरी बसवेल
महाराष्ट्राला मोठी राजकीय परंपरा आहे, देवेंद्र फडणवीस यांनी या परंपरेला काळीमा फासला आहे. विरोधकांना शत्रू मानून त्यांची बदनामी करणे, त्यांची राजकीय कारकीर्द संपवणे आणि खोटे आरोप करून त्यांना नाहक त्रास देणं या सर्वांमागे फडणवीस यांचा प्रताप होता. सोमय्या यांनीच सर्व उघड केल्यानं भाजपची भ्रष्टाचारारविरोधातील ही लढाई केवळ विरोधकांना संपवण्यासाठी होती हे स्पष्ट होतं. त्यामुळं भ्रष्टाचाऱ्यांना सोडणार नाही, पण त्यांना त्यांनी ब्लॅकमेल करून भाजपात सन्मानाने प्रवेश देणार हाच त्यांचा राजकीय अजेंडा आहे, हे समोर आला. त्यामुळं त्यामुळं आता जनता भाजपला घरी बसवेल, असा इशारा पटोलेंनी दिला.