तुझा किरीट सोमय्यासारखा व्हिडिओ व्हायरल करेन…व्यावसायिक अडकला हनी ट्रॅपमध्ये

तुझा किरीट सोमय्यासारखा व्हिडिओ व्हायरल करेन…व्यावसायिक अडकला हनी ट्रॅपमध्ये

Ahmednagr Honey Trap News : सोशल मीडियाचा अतिरेक किंवा त्याचा वापर जपून न केल्यास ते तुमच्यासाठी घातक देखील ठरू शकते याचाच प्रत्यय एका व्यावसायिकाला आला आहे. एक व्यावसायिक चक्क हनी ट्रॅपमध्ये (Honey Trap) अडकल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

एका बेपत्ता मुलीच्या शोधासाठी गेलेल्या मुंबई पोलिसांना मोठे यश: तब्बल 35 मुलींची सुखरुप सुटका

सोशल मीडियावर ओळख करुन व जवळीक साधून शहरातील युवा सराफ व्यावसायिकाला पैशांसाठी हनी ट्रॅपमध्ये अडकवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित महिलेने 10 लाख रुपयाची मागणी केल्याप्रकरणी कोतवाली पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ayodhya : श्वेत की श्याम…मंदिरात कोणता राम विराजमान होणार? जाणून घ्या, तीन मूर्तींची खासियत

याबाबत अधिक माहिती अशी, तक्रारदार एका व्यावसायिक असून त्याने सांगितले कि, मे 2023 पासून ते 18 डिसेंबरपर्यंत नगर शहरातील एका महिलेने सोशल मीडियावर फिर्यादीशी ओळख केली. त्यांनतर ती त्या व्यावसायिकास भेटू लागली. आपले तुझ्यावर प्रेम आहे असे सांगून तिने तक्रारदाराच्या दुकानातून एक सोन्याची अंगठी देखील नेली.

Horoscope Today: ‘वृषभ’ राशीला मिळणार भाग्याची साथ! जाणून घ्या काय सांगतय आजचं राशीभविष्य…

एके दिवशी त्या महिलेने फिर्यादीला गांधी मैदान येथे बोलावून व्हाट्सअप मेसेज सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देत 10 हजार रुपये उकळले. त्यानंतर त्या महिलेने तुझा किरीट सोमय्यासारखा व्हिडिओ व्हायरल करत तुझी बदनामी करण्याची धमकी दिली.

चहा विकणाऱ्यांना देश विकताना रेडहॅन्ड पकडलंय! कन्हैय्या कुमारचा पीएम मोंदींवर हल्लाबोल

त्यानंतर महिलेने वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरून फोन करून पैशाची मागणी करण्यास सुरुवात केली. लग्न कर नाहीतर 10 लाख रुपये मुलींच्या नावावर टाक अन्यथा खोट्या गंभीर गुन्ह्यात अडकविण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या फिर्यादीवरुन सदर महिलेसह इतर दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या

वेब स्टोरीज