दम देणं बंद करा, एकदाचा तो पेन ड्राइव्ह बाहेर काढा; हनी ट्रॅपवरून अजित पवारांचं विरोधकांना आव्हान

दम देणं बंद करा, एकदाचा तो पेन ड्राइव्ह बाहेर काढा; हनी ट्रॅपवरून अजित पवारांचं विरोधकांना आव्हान

Ajit Pawar give open chalenge to Opposition in Honey Trap and Pen Drive case : नुकतच विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन पार पडलं. त्यावेळी कॉंग्रेस नेते नाना पटोले यांनी मंत्रालय, नाशिक आणि ठाणे ही ठिकाणं हनी ट्रॅप नेटवर्कची केंद्रबिंदू बनल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाबाबत माझ्याकडे ठोस पुरावे आहेत, माझ्याकडे एक पेनड्राइव्ह आहे. असा दावा केला होता. या घडामोडींनंतर आज अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांना पेन ड्राईव्ह समोर आणण्याचं आव्हान दिलं आहे.

मोठी बातमी, थायलंडचा कंबोडियावर हवाई हल्ला, 9 जणांचा मृत्यू तर 2 लष्करी तळ उद्ध्वस्त

अजित पवार काय म्हणाले?

यावेळी अजित पवार यांना विरोधकांच्या हनी ट्रॅप आणि पेन ड्राईव्हच्या मुद्द्यावर प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी अजित पवार विरोधकांवर संतापल्याचं पाहायला मिळालं. ते म्हणाले की, एकदाच सांगतो, दम द्यायच बंद करा, एकदाच काय तो पेन ड्राइव्ह, तुमच्याकडे असणारे व्हिडिओ बाहेर काढा. एकदाच काय ते लोकांसमोर येऊ द्या. असं म्हणत त्यांनी विरोधकांना पेन ड्राईव्ह समोर आणण्याचं आव्हान दिलं आहे.

मी किर्तनात अन् भाऊ कलाकेंद्रात ऐकून शॉक… दौंड कला केंद्र गोळीबारावर आमदार मांडेकरांची प्रतिक्रिया

नेमकं प्रकरणं काय?

विधानसभेत काँग्रेसचे (Congress) आमदार नाना पटोले (Nana Patole) यांनी पुन्हा एकदा ‘हनी ट्रॅप’ प्रकरणावरून खळबळजनक विधान (Honey Trap) करत सर्वांचे लक्ष वेधले. मंत्रालय, नाशिक आणि ठाणे ही ठिकाणं हनी ट्रॅप नेटवर्कची केंद्रबिंदू बनल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. या प्रकरणाबाबत माझ्याकडे ठोस पुरावे आहेत, माझ्याकडे एक पेनड्राइव्ह आहे. पण मी कोणाचेही चारित्र्यहनन करणार नाही. जर सरकारने परवानगी दिली, तर मी तो पेनड्राइव्ह सभागृहात दाखवायला तयार आहे, असं पटोले यांनी स्पष्टपणे सांगितलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube