मोठी बातमी, थायलंडचा कंबोडियावर हवाई हल्ला, 9 जणांचा मृत्यू तर 2 लष्करी तळ उद्ध्वस्त

मोठी बातमी, थायलंडचा कंबोडियावर हवाई हल्ला, 9 जणांचा मृत्यू तर 2 लष्करी तळ उद्ध्वस्त

Thailand Cambodia Conflict : इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) युद्धानंतर आता आणखी एक मोठी बातमीसमोर आली आहे. या बातमीनुसार, थायलंड (Thailand) आणि कंबोडियामध्ये (Cambodia) पुन्हा एकदा सीमेवरुन वाद पेटला आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, दोन्ही देशांच्या सीमेवर गोळीबार झाला आहे. तर दुसरीकडे थायलंडने कंबोडियावर हवाई हल्ला (Thailand Air Strikes on Cambodian) केला आहे. या हवाई हल्ल्यात थायलंडने कंबोडियाच्या दोन लष्करी तळ पूर्णपणे उद्ध्वस्त केले आहे.  थायलंडच्या या हवाई हल्ल्यात 9 जणांचा मृत्यू झाला आहे.

तर दुसरीकडे थाई सैनिकांच्या घुसखोरीनंतर आम्ही ही प्रत्युत्तरात्मक कारवाई केली असल्याची माहिती कंबोडियाचे संरक्षण प्रवक्ते जनरल माली सोचेता यांनी दिली आहे. तर कंबोडियाचे पंतप्रधान म्हणाले की, थायलंडने त्यांच्या ओड्डार मीन्चे आणि प्रेह विहार प्रांतातील मंदिरे आणि लष्करी तळांवर हल्ला केला. ते म्हणाले की, आम्हाला नेहमीच शांततापूर्ण तोडगा हवा आहे. वृत्तानुसार, गुरुवारी कंबोडियन हल्ल्यात दोन थाई सैनिकांचा मृत्यू झाला.

माहितीनुसार, दोन्ही देशांमध्ये 8 ठिकाणी हा वाद सुरु आहे. सध्या दोन्ही देशांकडून या संघर्षात हलक्या आणि जड शस्त्रांचा वापर केला जात आहे. दोन्ही देश एकमेकांच्या सैनिकांना लक्ष्य करत असल्याने आतापर्यंत या संघर्षात 9 जणांचा मृत्यू झाला आहे. संघर्ष वाढत असल्याने थायलंडने 86 गावांमधील 40 हजार लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवले आहे. कंबोडियाचे पंतप्रधान हुन मानेट म्हणाले की, थायलंडने ओड्डार मीन्चे आणि ता मोन थॉम आणि ता काब्रे मंदिरांना लक्ष्य केले आहे.

‘देवाच्या झोळीत हात, शनि देवाचा प्रकोप त्यांना…’; मंत्री विखेंचा पुन्हा गडाखांवर निशाणा

follow us
  • fb
  • instagram
  • youtube