थायलंडची सुंदरी ओपल सुचाता ठरली मिस वर्ल्ड; भारताच्या नंदिनी गुप्ताचं स्वप्न भंगलं

थायलंडची सुंदरी ओपल सुचाता ठरली मिस वर्ल्ड; भारताच्या नंदिनी गुप्ताचं स्वप्न भंगलं

Miss World 2025 Winner : भारतात आयोजित करण्यात आलेल्या 72 व्या मिस वर्ल्ड स्पर्धेचा ग्रँड फिनाले शनिवारी हैदराबादेत पार पडला. या स्पर्धेत भारताची नंदिनी गुप्ता विजेता होईल. तिलाच मिस वर्ल्डचा मान मिळेल असे वाटत होते. परंतु, भारताचं स्वप्न स्वप्नच राहिलं. या स्पर्धेत थायलंडची सुंदरीने बाजी मारली. ओपल सुचाता चुआंग्सरीने मिस वर्ल्ड 2025 चा मुकूट मिळवला.

मिस वर्ल्ड 2025 स्पर्धेच्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली. थायलंडच्या ओपल सुचाताला मिस वर्ल्डचा मुकूट परिधान करण्यात आला. या स्पर्धेत मिस मार्टिनिकने चौथा क्रमांक प्राप्त केला. मिस पोलंडला या स्पर्धेत तिसरा तर मिस इथिओपियाला दुसरा क्रमांक मिळाला. या स्पर्धेत अंतिम फेरीची सुरुवात शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजल्यापासून झाली. यामध्ये जगभरातील 108 सुंदरी स्पर्धक होत्या. या राउंडनंतर विजेत्यांच्या घोषणेला सुरुवात झाली. परंतु, भारताला निराश व्हावे लागले. कारण भारताचे प्रतिनिधीत्व करणारी नंदिनी गुप्ताला विजयी होता आले नाही.

चेक रिपब्लिकची क्रिस्टीना पिजकोवाने जिंकला 71st Miss World चा किताब; भारताच्या सिनी शेट्टीचं स्वप्नभंग

नंदिनी गुप्ता टॉप 8 मधून बाहेर

नंदिनी गुप्ता टॉप 8 मध्ये स्थान मिळवण्यात अपयशी ठरली. याआधी गुप्ता चार महाद्विपीय विजेत्यांतील एक होती. तिने टॉप मॉडेल सेगमेंटमध्ये स्पर्धा करून हे स्थान मिळवले होते. गुप्तासह अन्य तीन जॅस्मून गेरहार्ट (मिस आयर्लंड), सेल्मा कामन्या (मिस नामिबीया) आणि ऑरेली जोआचिम (मिस मार्टिनिक) या होत्या. परंतु, या स्पर्धेत नंदिनी गुप्ताला अपेक्षित यश मिळालं नाही. पहिल्या 8 विजेत्यांतही नंदिनी गुप्ता नव्हती.

नंदिनी गुप्ता कोण ?

या स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व केलेली नंदिनी गुप्ता राजस्थानातील कोटा येथील आहे. नंदिनी फक्त 21 वर्षांची आहे. ती ब्यूटी पेजेंटमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करत होती. तिच्या विजयाबद्दल लोकांच्या अपेक्षा होत्या. याआधी नंदिनीने 2023 मध्ये फेमिना मिस इंडियाचा पुरस्कार जिंकला होता. यानंतर आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होण्याचा मार्ग मोकळा झाला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube