‘देवाच्या झोळीत हात, शनि देवाचा प्रकोप त्यांना…’; मंत्री विखेंचा पुन्हा गडाखांवर निशाणा

Minister Radhakrishna Vikhe Criticize Shankarrao Gadakh : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्री क्षेत्र शनिशिंगणापूर देवस्थान (Shanishwar Temple App Fraud) यामध्ये बनावट ॲप प्रकरण उघडकीस आले. त्यानंतर एकच खळबळ माजली. याप्रकरणी आता देवस्थानातील पुजाऱ्यांची देखील चौकशी केली जाणार आहे. श्री शेत्र शनेश्वर देवस्थानाच्या बनावट आहे प्रकरणी पावसाळी अधिवेशनामध्ये नेवासा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे यांनी लक्षवेधी मांडली होती. दरम्यान यावर उत्तर देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत चौकशीचे आदेश दिलेले आहे. दरम्यान यावरती मंत्री राधाकृष्ण विखे यांनी (Minister Radhakrishna Vikhe) देखील भाष्य केले होते.
कोकाटेंच्या करेक्ट कार्यक्रमाची तारीख ठरली; तिजाची वेळ म्हणत अजितदादांनी तलवार उपसलीच
शनि देवाचा प्रकोप…
बनावट ॲप घोटाळ्याप्रकरणी बोलताना मंत्री राधाकृष्ण विखे म्हणाले की, अधिकारी असेल अत्यंत गंभीर आरोप देवस्थानाचे विश्वस्त असतील अधिकारी असतील झालेले आहे. आता याबाबत चौकशी सुरू झालेली आहे. ज्यांनी ज्यांनी शनेश्वर महाराजांच्या जोडीत हात घातला (Maharashtra Politics) असेल, त्यांना शासनाकडून तर कारवाईला सामोरे जावेच लागेल. तसेच शनि देवाचा प्रकोप देखील त्यांना अनुभवायला मिळेल अशा शब्दात एक प्रकारे मंत्री राधाकृष्ण विखे यांनी माजी मंत्री असलेले शंकरराव गडाख यांचे नाव न घेता त्यांना जोरदार टोला लगावला. तसेच यापूर्वी देखील राधाकृष्ण विखे यांनी गडाखांवरती निशाणा साधताना शैनेश्वर देवस्थानाच्या झोळीत गडाख यांनी हात घातल्याचा आरोप केला होता.
नेमकं प्रकरण काय?
शनि शिंगणापूर येथील श्री शैनेश्वर देवस्थान ट्रस्टच्या 500 कोटी रुपयांसह नोकर भरती घोटाळा आणि बनावट ॲप द्वारे भक्तांच्या फसवणूक प्रकरणी आता प्रशासनाने पावले उचलले आहे. शनेश्वर देवस्थान अन् भाविकांची ॲप वेबसाईटचा वापर करून आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचे दावा करण्यात आले आहेत. आता या प्रकरणी शनिशिंगणापूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय. अधिवेशनामध्ये आमदार लंघे यांनी हा मुद्दा उचलून धरल्याने आता खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत कारवाईचे आदेश दिले आहे. या प्रकरणावरून माजी आमदार शंकरराव गडाख यांच्यावर देखील निशाणा साधला जात आहे, अशी राजकीय चर्चा सुरू आहे.
माजी आमदार गडाख यांची भूमिका
नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी शनेश्वर देवस्थानातील घोटाळा अन् भ्रष्टाचार प्रकरणावरून माजी आमदार शंकराव गडाख यांच्यावरती निशाणा साधला होता. यावरती प्रत्युत्तर देताना गडाखांनी म्हटलंय की, विखे यांनी माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे आहेत. माझ्या नावाचा गैरवापर करून शनिशिंगणापूर देवस्थानमधील कुण्या आजी-माजी विश्वस्त अन् कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध झाले, तर त्या भ्रष्ट कर्मचारी व विश्वस्तांची संपत्ती जप्त करावी. त्यांच्या विरोधात कठोर कायदेशीर कारवाई करावी, असे म्हणत गडाख यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.