एक फोन कॉल अन् पंतप्रधान पदावरून व्हाव लागलं पायउतार; थायलंडमध्ये नक्की काय घडलं?

एक फोन कॉल अन् पंतप्रधान पदावरून व्हाव लागलं पायउतार; थायलंडमध्ये नक्की काय घडलं?

Thailand PM Politics : थायलंडमध्ये सध्या मोठी राजकीय घडामोड घडली आहे. (Thailand) येथे एका टेलिफोन कॉलमुळे पंतप्रधान पॅतोंगटार्न शिनावात्रा यांची खुर्ची गेली आहे. कोर्टाने पंतप्रधान शिनावात्रा यांना निलंबित केलं आहे. या निर्णय शत्रू देश कंबोडीयाचे सीनेट अध्यक्ष हुन सेन यांच्याशी केलेल्या संभाषणामुळे झाला आहे.

शिनावात्रा यांचे हे टेलिफोनिक संभाषण अशा काळात झाले जेव्हा सीमेवर थायलंड आणि कंबोडीयन सैनिक आपआपसात भिडले होते. २८ मे रोजी सीमेवर दोन्ही देशांची सैनिक परस्परांना भिडले होते. त्यानंतर १५ जून रोजी थायलंडच्या पंतप्रधान शिनावात्रा यांनी कंबोडीयाचे सीनेट अध्यक्ष हुन सेन यांच्याशी संभाषण केलं होते. दोघांचे हे संभाषण लीक झाले आहे. यानंतर थायलंडमध्ये राजकीय भूकंप आला आहे.

विरोधकांनी शिनावात्रा यांच्यावर राष्ट्रीय हिताशी समझोता करणे आणि सैन्य अधिकार कमजोर करण्याचा आरोप केला आहे. हुन सेन यांनीच शिनावात्रा यांच्यातील हे संभाषण रेकॉर्ड केलं होतं. त्यानंतर त्यांनी ते लीक केलं. हन सेन यांनी दावा केला की त्यांनी हे संभाषण ८० हून अधिक लोकांना पाठवलं आहे. या संभाषणात शिनावात्रा आणि हुन सेन यांना थायलंड आणि कंबोडीयातील सीमा तणावावर उपाय योजने आणि संघर्षानंतर लावलेले निर्बंध कमी करण्याबद्दल चर्चा झाल्याचं उघड झालं आहे.

थायलंडची सुंदरी ओपल सुचाता ठरली मिस वर्ल्ड; भारताच्या नंदिनी गुप्ताचं स्वप्न भंगलं

काही बातम्यांनुसार शिनावात्रा यांनी संभाषण करताना हन सेन यांना अंकल म्हटल्याचा दावा केला आहे. हुन सेन हे शिनावात्रा यांचे वडील थाकसिन शिनावात्रा यांचे जवळचे मित्र होते. ते थायलंडचे माजी पंतप्रधान देखील होते. शिनावात्रा यांनी कथितपणे हुन सेने यांना थायलंडच्या दुसऱ्या पक्षाचा म्हणणे ऐकू नये असा आग्रह केला आणि कंबोडियावर टीका करणाऱ्या एका थायलंडच्या सेना कमांडरला टार्गेट केले होते. लीक झालेल्या संभाषणात शिनावात्रा यांनी सेना कमांडरला एका विरोधकाचे लेबल लावल्याचे उघडकीस आलं होतं.

शिनावात्रा एवढ्यावरच थांबल्या नाहीत त्यांनी आपल्याच सेना कमांडरवर टीका करीत त्यांना केवळ कुल दिसायचे आहे अशी टीका केली होती. त्यांनी हुन सेन यांना तुम्हाला काय पाहीजे ते सांगा असं सांगत आपण हा वाद मॅनेज करु असंही म्हटल्याचं उघड झालं आहे. थायलंडमधील टीकाकारांनी हे विधान अत्यंत तडजोड करणारे आणि थायलंडच्या राजनैतिक आणि लष्करी प्रतिष्ठेला हानी पोहोचवणारे असल्याचा आरोप केला आहे.

28 मे रोजी थायलंड आणि कंबोडीयन सीमेवरील वादग्रस्त क्षेत्रात गोळीबार झाला होता. दोन्ही देशांनी एकमेकांवर आरोप लावला आणि आत्मरक्षेसाठी आम्ही कारवाई करु अशी धमकी दिली आहे. या घटनेमुळे दोन्ही देशातील बरीच वर्षे सुरु असलेला सीमावाद पुन्हा उकरला गेला आहे. दोन्ही देशांनी नंतर तणाव कमी करण्याची हमी दिलेली आहे.फेब्रुवारी कंबोडियन सैनिकांनी वादग्रस्त जागेतील पुरातन मंदिर परिसरात प्रवेश करीत तेथे राष्ट्रगीत म्हटलं होतं. त्यामुळे थायलंडचे सैनिक भडकले. हे मंदिर १००० वर्षे जुने असून दोन्ही देश त्यावर दावा करीत आहेत.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube