मी किर्तनात अन् भाऊ कलाकेंद्रात ऐकून शॉक… दौंड कला केंद्र गोळीबारावर आमदार मांडेकरांची प्रतिक्रिया

Bhor Mulashi MLA Shankar Mandekar Brother Firing in Daud Kalakendra : दौंड तालुक्यातील चौफुला गावातील (Daud) एका कला केंद्रात गोळीबार झाल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरू होती. सोमवारी (21 जुलै) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडल्याचं सांगितलं जात. गोळीबारात भोर वेल्हा मुळशीचे अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावाचा सहभाग असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यात तिघांना अटक देखील झाली आहे. त्यावर आता आमदार शंकर मांडेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले शंकर मांडेकर?
मी किर्तनात होतो. पण भाऊ कलाकेंद्रात होता हे ऐकून शॉक बसला. मला पोलिस अधिकाऱ्यांचा फोन आला. मी स्पष्ट त्यांना सांगितलं की, रीतसर कारवाई करा. कायद्याप्रमाणे जे आहे ती कारवाई करा असे मी स्पष्ट सांगितलं आहे. जे फिर्यादी आहे त्यांनी गुन्हा दाखल करायला सांगितलं तर गुन्हा दाखल होईलच. या प्रकरणी आम्हालाच माहिती नव्हती, काय झालं ते त्याचं त्यांना माहिती. पोलिसांनी मला सांगितलं की, तुमच्या भावावर गुन्हा दाखल होतोय.
मोठी बातमी! महसूल अधिकाऱ्यांची आता रोज फेसॲपद्वारे हजेरी; चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
अजित दादा यांच्याशी माझं बोलणं झालेलं नाही. एका पत्रकाराने सुद्धा मला सांगितलं की असं घडलं आहे. चुकीचं काही घडलं असेल तर हस्तक्षेप करणार नाही. मग माझा भाऊ असेल तरी चालेल. भावाकडे बंदुकीचा परवाना नाही ज्याची बंदूक आहे त्याला विचारतील. माझा भाऊ शेती बघतो, समाजकारण करतो, वारकरी संप्रदाय मधील आहे.
कोकाटेंच्या करेक्ट कार्यक्रमाची तारीख ठरली; तिजाची वेळ म्हणत अजितदादांनी तलवार उपसलीच
कोणी कुठे जावं हा त्याचा त्याचा प्रश्न आहे. कोणी काय खाव, प्यावं tyacha अधिकार आहे. माझा भाऊ असेल तरी त्यावर कारवाई होईलच. ही घटना घडल्यावर ते सकाळी घरी आले. मी रस्त्याची पाहणी करायला गेलो होतो. गणेश जगताप सुद्धा तिथे उपस्थित होते. भावाने मला काही सांगितलं नाही. पोलिसांनी मला एवढेच सांगितलं आहे की, गोळीबार झाला आणि तिथे तुमचा भाऊ होता. असं म्हणत मांडेकर यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं प्रकरणं काय?
दौंड तालुक्यातील चौफुला गावातील (Daud) एका कला केंद्रात गोळीबार झाल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरू होती. सोमवारी (21 जुलै) सायंकाळच्या सुमारास ही घटना घडल्याचं सांगितलं जात. गोळीबारात भोर वेल्हा मुळशीचे अजित पवार यांच्या पक्षाचे आमदार शंकर मांडेकर यांच्या भावाचा सहभाग असल्याचं स्पष्ट झालं आहे.
या घटनेनं संपूर्ण दौंड परिसरात खळबळ उडाली आहे. अखेर आज (23 जुलै) न्यू अंबिका कला केंद्राचे व्यवस्थापक बाबासाहेब आमदारे यांनी या गोळीबार प्रकरणी यवत पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली. या फिर्यादीवरून आमदारांच्या भावासह चार आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असल्याची माहिती बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली.
कोण म्हणतं संधी शोधावी लागते? अभिनेत्री किरण खोजेच्या आयुष्यानं तिला शोधलं..
गुन्हा दाखल करण्यात आलेल्या व्यक्ती या नेमक्या कोण आहेत? त्यांचे राजकीय व्यक्तींशी काही कनेक्शन आहे का? तसंच, त्यांनी नेमका कोणत्या कारणावरून गोळीबार केला? याबाबतचा तपास पोलीस करत असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली. बाबासाहेब मांडेकर, गणपत जगताप, चंद्रकांत मारणे अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावं आहेत.
मोठी बातमी! मंत्री अन् आमदारांच्या महाविद्यालयांना दणका, प्रवेश थांबवले; कारणही धक्कादायक
हा गोळीबार सत्ताधारी पक्षातील एका मोठ्या नेत्याशी संबंधित व्यक्तीनं केल्याची माहिती दबक्या आवाजात चर्चिली जात होती. मिळालेल्या माहितीनुसार, थिएटरमध्ये नृत्य सुरू असताना, वाद निर्माण झाला आणि त्यातूनच गोळीबार करण्यात आला, अशी चर्चा होती. या घटनेत नृत्य करणारी एक तरुणी जखमी झाल्याचंही बोललं जात होतं. मात्र, आता पोलिसांनी या घटनेत कोणीही जखमी झालं नसल्याचं स्पष्ट सांगितलं आहे.