धक्कादायक ! एक्स्ट्रा मॅरिटल अफेर्सच्या यादीत ‘हे’ शहर टॉप तर मुंबई, पुण्याचा क्रमांक किती? जाणून घ्या…

धक्कादायक ! एक्स्ट्रा मॅरिटल अफेर्सच्या यादीत ‘हे’ शहर टॉप तर मुंबई, पुण्याचा क्रमांक किती? जाणून घ्या…

Extra Maritail Afairs increse in India Ashley Madison Report : उत्तर प्रदेशातील सौरभ हत्याकांड असो किंवा मध्य प्रदेशातील राजा रघुवंशी हे अशी अनेक प्रकरणं देशामध्ये वारंवार घडत आहेत. याचं कारण म्हणजे देशामध्ये वाढत चाललेले विवाह बाह्य संबंध. (Extra Maritail Afairs) हे केवळ या घटनांवरून सांगितलं जात नाही आहे. यावर एक अहवाल समोर आला आहे. ज्यामध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. काय आहे हा अहवाल? जाणून घेऊ सविस्तर…

मोठी बातमी! मंत्री अन् आमदारांच्या महाविद्यालयांना दणका, प्रवेश थांबवले; कारणही धक्कादायक

काय आहे हा अहवाल?

जागतिक डेटींग साईट एशले मॅडिसन या संस्थेने एक अहवाल दिला आहे. एशले मॅडिसन ही एक एजेन्सी आहे. जी एक कॅनडा आणि फ्रान्समधील ऑनलाइन डेटिंग आणि सोशल मीडिया नेटवर्किंग सेवा आहे. जी 2002 पासून सुरू झाली आहे. ही संस्था त्या लोकांसाठी काम करते जे लोक लग्न केलेले असूनही (Extra Maritail Afairs) दुसरा जोडीदार शोधत असतात.

हर्षल पाटीलच्या नावावर कोणतंच काम नाही, गुलाबराव पाटलांचा धक्कादायक खुलासा

यामध्ये विवाह बाह्य संबंधांच्या प्रकरणांबाबत देशातील 10 प्रमुख शहरांचा डेटा देण्यात आला आहे. ज्यामध्ये दिल्ली एनसीआरचे तब्बल 9 भाग आहेत. यामध्ये दिल्ली मध्य हा भाग दुसऱ्या स्थानावर तर धक्कादायक म्हणजे कांचीपूरम हे तामिळनाडूमधील एक लहान शहर पहिल्या क्रमांकावर आहे. जे गेल्या वर्षी 17 व्या क्रमांकावर होते. या शहराने दिल्ली आणि मुंबई यांसारख्या मोठ्या शहरांना देखील मागे टाकले आहे.

आज हर्षल पाटील गेलाय…पण 90 हजार कोटी थकलेल्या कंत्राटदारांचे काय ?

दुसरीकडे गेल्या वर्षी 2024 च्या अहवालामध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबई हे शहर थेट टॉप 20 शहरांच्या यादीतून बाहेर पडले आहे. तसेच या अहवालामध्ये दक्षिण-पश्चिम दिल्ली, पूर्व दिल्ली, दक्षिण दिल्ली, पश्चिम दिल्ली, उत्तर पश्चिम दिल्ली, गुरुग्राम, नोएडा आणि गाजियाबाद या भागांचा सहभाग आहे. तर जयपुर, चंडीगढ़, रायगढ़ आणि कामरूप यांसारख्या शहरांचा देखील टॉप 20 मध्ये समावेश आहे.

मोठी बातमी! अनिल अंबानींविरुद्ध ED ची कारवाई; तब्बल 50 ठिकाणी टाकले छापे

या अहवालामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे की, भारतात विवाह बाह्य संबंध किंवा जोडीदाराला चिट करण्याचे प्रमाण वाढलं आहे. विशेषत: टियर 2 आणि टिअर 3 शहरांमध्ये हे प्रमाण जास्त आहे. या आकडेवारीसह या अहवालामध्ये भारतात विवाह बाह्य संबंध किंवा जोडीदाराला चिट करण्याचे प्रमाण वाढण्याची कारणं देखील सांगण्यात आली आहेत.

सावधान! भारतात सायबर फ्रॉडचं जाळं; एकाच वर्षात तब्बल 23 हजार कोटींची फसवणूक

यामध्ये लोकांकडून वापरली जाणारी डेटींग वेबसाईट, डिजीटल स्वातंत्र्य, सोशल मिडीयाचा अति वापर, कामाचे दिर्घ तास, पती-पत्नी किंवा जोडीदारांचे वेगवेगळ्या शहरांमध्ये राहणे, भावनिक अंतर, सामाजित घटक यांसारख्या गोष्टींचा परिणाम नातेसंबंध आणि लोकांवर जास्त होत आहे. त्यामुळे या अहवालाच्या सर्व्हेमध्ये मत विचारण्यात आलेल्या लोकांपैकी तब्बल 53 टक्के लोकांनी त्यांच्या जोडीदाराला चीट करत असल्याचं मान्य केलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube