राज्यात सीमावादाचा प्रश्न चिघळला; ‘या’ जिल्ह्यात सीमावर्ती भागात गुजरातकडून घुसखोरीचा प्रयत्न
महाराष्ट्राच्या सीमेवर असणाऱ्या वेवजी गावात गुजरातकडून हळूहळू सीमाभागात घुसण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला.
Gujarat intrusion into Maharashtra : सीमावाद हा विषय महाराष्ट्रासाठी काही नवीन नाही. त्यातच आता महाराष्ट्र आणि गुजरात यांच्यातील सीमावाद आता पुन्हा उफाळून आला आहे. पालघरमधील(Palghar) तलासरी तालुक्यातील वेवजी गावात गुजरात(Gujrat) घुसखोरी करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. महाराष्ट्राच्या(Maharashtra) सीमेवर असणाऱ्या वेवजी गावात गुजरातकडून हळूहळू महाराष्ट्राच्या सीमाभागात घुसण्याचा प्रकार सुरू असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. गावात सीमा वाढवून गाव गिळंकृत करण्याचा गुजरातचा डाव असल्याचा ग्रामस्थ्यांनी केला आहे. मागच्या 25-30 वर्षांपासून या भागात सीमावाद सुरू आहे.
वेवजी गावातील ग्रामस्थ्यांनी केलेल्या आरोपामुळे महाराष्ट्र्र-गुजरात सीमावाद पुन्हा उफाळून आला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत आता दोन्ही राज्यांच्या अधिकाऱ्यांकडून सीमावर्ती भागात मोजणी सुरू करण्यात आली आहे. पालघर जिल्हा प्रशासनासह गुजरातच्या उंबरगाव तहसील कार्यालयाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत सीमावर्ती भागात संयुक्तरित्या मोजणी पार पडते. त्यानंतर गुजरातने किती प्रमाणात महाराष्ट्राच्या सीमेवर अतिक्रमण केले आहे, हे स्पष्ट होणार आहे. मात्र ऐन वेळी हिवाळी अधिवेशनात हा वाद समोर आल्याने मोजणी करून जिल्हा प्रशासन वेळ मारून नेत असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान या सीमावादावर तोडगा काढण्यासाठी दोन्ही राज्यांकडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत
गिफ्ट सिटीच्या माध्यमातून महाराष्ट्रातले अनेक उद्योग गुजरातला गेले. डायमंड मार्केट गुजरातला नेले आता नुकताच कोकणच्या हापूसवर देखील गुजरातकडून दावा करण्यात आला होता. आता महाराष्ट्रात अतिक्रमण गुजरात सरकारकडून होतंय, हे दिसून येत.
