कोल्हापूरात मविआची ताकद वाढली! 17 माजी महापौर, 220 माजी नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा

कोल्हापूरात मविआची ताकद वाढली! 17 माजी महापौर, 220 माजी नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा

17 former mayors support Shahu Maharaj : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघा महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) शाहू महाराज (Shahu Maharaj) छत्रपती रिंगणात आहेत. तर महायुतीकडून विद्यमान खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandalik) आखाड्यात आहेत. ही लढत चुरशीची होणार असून आता शाहू महाराजांना 220 माजी नगरसेवक आणि 17 माजी महापौरांनी जाहीर पाठिंबा दिला आहे.

अहिल्यादेवी होळकरांचे वंशज हाती घेणार तुतारी, भूषणसिंह होळकर उद्या करणार पक्षप्रवेश 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंग चढू लागला आहे. सत्ताधारी आणि विरोधकांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे. दोन दिवसांपूर्वी महायुतीच्या वतीने नगरसेवकांचा मेळावा घेऊन 105 नगरसेवकांनी संजय मंडलिकांना पाठिंबा दिला. तर आज इंडिया आघाडी आणि महाविकास आगाडीने 220 माजी नगरसेवक आणि 17 माजी महापौरांचा पाठिंबा मिळत महायुतीवर चांगलीच कुरघोडी केली. कोल्हापूर हा पुरोगामी विचारांचा जिल्हा असून कोल्हापूरचे पुरोगामित्व वाचवण्यासाठी शाहू महाराज निवडणूक लढवत असल्याची भावना या बैठकीत व्यक्त करण्यात आली.

40 वर्षानंतही परकं मानतात, मग तळपायाची आग मस्तकात जाणार…; अजित पवार संतापले 

या सर्व माजी नगरसेवक व महापौरांनी न्यू पॅलेस येथे झालेल्या मेळाव्यास उपस्थित राहून शाहू महाराजांचा प्रचार करण्याचा निर्धार केला. या मेळाव्याला काँग्रेसचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, आमदार पी.एन. पाटील, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयंत आसगावकर, आमदार जयश्री जाधव, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही.बी. पाटील आदी नेते उपस्थित होते.

यावेळी बोलतांना सतेज पाटील म्हणाले की, कोल्हापुरातील 18 माजी महापौर आणि 220 माजी नगरसेवकांनी शाहू महाराजांना पाठिंबा दिला आहे. प्रत्येक गावातील जनता शाहू महाराजांच्या पाठीशी आहे. तुम्ही टीका केली तर प्रमुख नेते म्हणून मला टीका करावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला.

संजय मंडलिक यांनी केलेल्या टीकेवर ते म्हणाले की, लोकसभा निवडणूक खिलाडूवृत्तीने व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, तर विरोधक शाहू महाराजांचा सन्मान बाजूला ठेवून अपमान करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्या या वृत्तीला जनता चोख प्रत्युत्तर देईल, असा इशारा त्यांनी दिला. कोल्हापुरात रूसवे काढण्यासाठी वरिष्ठांना याव लागलं होतं. आता पायाखालची वाळू सरकायला लागली हे लक्षात आल्यानं मुख्यमंत्र्यांना वारंवार कोल्हापुरात यावे लागत आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.

शाहू महाराज म्हणाले, मला पाठिंबा दिल्याबद्दल कोल्हापूरच्या सर्व माजी महापौर, माजी नगरसेवकांचा मी ऋणी आहे. यापुढे कोल्हापूरच्या विकासासाठी सर्वांना एकत्र यावे लागणार असून कोल्हापूरच्या विकासात कोणत्या मुद्द्यांना प्राधान्य द्यायचे यासाठी नगरसेवकांचा सल्ला महत्त्वाचा ठरणार आहे. नगरसेवकांनी भरपूर कामे केली असून त्यातील एकादे कामे शिल्लक राहिल्यास त्याचा पाठपुरावा केला जाईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज