ओबीसी बहुजन पार्टीकडून 9 उमेदवारांची यादी जाहीर, कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार ?

ओबीसी बहुजन पार्टीकडून 9 उमेदवारांची यादी जाहीर, कोणत्या मतदारसंघातून कोण लढणार ?

OBC Bahujan Party Candidate List : लोकसभा निवडणुका (Lok Sabha elections) अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांकडून आपापले उमेदवारी जाहीर केले जात आहेत. भाजप, ठाकरे गट, शिंदे गट, वंचित बहुजन आघाडीनंतर आता ओबीसी बहुजन पार्टीने (OBG Bahujan Party) आपल्या लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत 9 उमेदवारांच्या नावाचा समावेश आहे. ओबीसी बहुजन पार्टीचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे (Prakash Shendge) यांनी ही यादी जाहीर केली आहे.

अमरावतीत महायुतीचं टेन्शन वाढलं! नवनीत राणांविरोधात ‘प्रहार’कडून दिनेश बूब रिंगणात 

सांगलीत चंद्रहार पाटील विरुध्द प्रकाश शेंडगे
या यादीत सांगलीतून स्वत: प्रकाश (आण्णा) शिवाजीराव शेंडगे यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळं सांगलीत चंद्रहार पाटील विरुध्द प्रकाश शेंडगे असा सामना रंगणार आहेत. तर बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या विरोधात महेश सिताराम भागवत यांनी उमदेवारी देण्यात आली.

तर परभणीत अ‍ॅड. हरिभाऊ शेळके आणि हिंगालोत अ‍ॅड.. रवी यशवंतराव शिंदे यांना उमेदवारी जारी झाली आहे. याशिवाय ओबीसी बहुजन पार्टीने नांदेड, यवतमाळ, बुलढाणा, शिर्डी आणि हातकणंगलेमध्ये आपले उमदेवार जाहीर केलेत.

मोठी बातमी : निलेश लंकेंच्या हाती तुतारी ! आमदारकीचा राजीनामा, विखेंविरोधात रिंगणात 

पक्षाने जाहीर केलेल्या पत्रकात लिहिलं की, आज (दि.२९ मार्च) रोजी ओबीसी बहुजन पार्टीच्या सुकाणू समितीची बैठक पार पडली. सदर बैठकीत पक्षाच्या वतीने लोकसभा निवडणूक – २०२४ साठी उमदेवांची नावे ठरली.
कोणाल मिळाली उमेदवारी?
१) सांगली –  प्रकाश (आण्णा) शिवाजीराव शेंडगे
२) बारामती –  महेश सिताराम भागवत
३) परभणी- अ‍ॅड. हरिभाऊ शेळके
४) हिंगोली –  अ‍ॅड. रवी यशवंतराव शिंदे
५) नांदेड –  अ‍ॅड. अविनाश विश्वनाथ भोसीकर
६) यवतमाळ – प्रशांत महादेव बोडखे
७) बुलढाणा – नंदू जगन्नाथ लवंगे
८) शिर्डी (sc) – डॉ. अशोक रामचंद्र आल्हाट
९) हातकणंगले – सौ मनीषा डांगे / प्रा संतोष कोळेकर

शाहू महाराजांना पाठींबा जाहीर
दरम्यान, कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांना पाठिंबा देण्यात येत आहे.त्याचबरोबर अकोला लोकसभा मतदारसंघासाठी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांना पाठिंबा जाहीर करीत आहोत, अशी भूमिका ओबीसी बहुजन पार्टीने घेतली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज