अमरावतीत महायुतीचं टेन्शन वाढलं! नवनीत राणांविरोधात ‘प्रहार’कडून दिनेश बूब रिंगणात

अमरावतीत महायुतीचं टेन्शन वाढलं! नवनीत राणांविरोधात ‘प्रहार’कडून दिनेश बूब रिंगणात

Dinesh Boob : अमरावती लोकसभा (Amravati Lok Sabha) मतदारसंघातील भाजप उमेदवार नवनीत राणांच्या (Navneet Rana) अडचणीत वाढ झाली. कारण, आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांच्यानंतर आता प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनीही राणांविरोधात दंड थोपटलेत. एवढेच नाही तर राणा यांना शह देण्यासाठी त्यांनी आपल्या पक्षाच्यावतीने दिनेश बूब (Dinesh Boob) यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळं भाजपची डोकेदुखी वाढली आहे.

मोठी बातमी : अजितदादांना धक्का; विखेंवर प्रहार करत निलेश लंके लोकसभेच्या आखाड्यात! 

भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाने अमरावती लोकसभा मतदारसंघातून नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर केली आहे. खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा आणि बच्चू कडू यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली होती, आपण महाआघाडीतून बाहेर पडलो नसलो तरी अमरावतीत राणांच्या विरोधात भूमिका घेऊ, असं त्यांनी जाहीरपणे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेने नवनीत राणा यांच्याविरोधात ठाकरे गटाचे नेते दिनेश बूब यांना उमेदवारी देण्याची घोषणा केली आहे. शुक्रवारी बूब यांनी प्रहारचे आमदार राजकुमार पटेल यांच्या उपस्थितीत एका पत्रकार परिषदेत प्रहारमध्ये प्रवेश केला.

तुम्हाला 4 तारखेला कळेल खरा डॉन कोण? सुजय विखेंविरोधात लंके मैदानात 

यावेळी बोलतांना आमदार पटेल म्हणाले की, प्रहार कार्यकर्त्यांच्या बैठकीत संघटनेचा अमरावतीतून उमेदवार देण्याची मागणी करण्यात आली. त्यानुसार संघटनेकडून दिनेश बूब यांना रिंगणात उतरवले असल्याच पटेल म्हणाले.

तर बूब यांनी सांगितलं की, ठाकरे गटाने माझी उमेदवारी आधीच जाहीर केली होती. पण मला ती मिळाली नाही. त्यामुळं लोकांनी माझ्याकडे प्रहार कडून निवडणूक लढवण्याचा आग्रह धरला. त्यामुळं मी त्यांच्या मताचा आदर केला. जनता सूक्ष्म निरीक्षण करत असते. पदावर कोणी मस्ती करत आहे, त्यावर त्यांची नजर असते. या ठिकाणी विरोधात २ उमेदवार आहेत. पण माझा विजय निश्चित असेल. लोकांना मला निवडून दिल्याचा पश्चाताप होणार नाही, असा मी शब्द देतो, असंही बूब म्हणाले.

तुम्हाला 4 तारखेला कळेल खरा डॉन कोण? सुजय विखेंविरोधात लंके मैदानात 

आज मी ठाकरे गटाचा राजीनामा दिला. पण मी माझ्या रक्तातून शिवसेना काढू शकत नाही. मी भगवा ध्वज घेऊन पुढे जात आहे. मी प्रहारकडून लढावे अशी प्रत्येकाची इच्छा होती. त्यामुळेच मी आज आमदार राजकुमार पटेल यांच्या उपस्थितीत प्रहारमध्ये जाहीर प्रवेश केला, असेही दिनेश बूब यांनी यावेळी सांगितले.

बच्चू कडू यांनी नवनीत राणा यांच्या विरोधात उमेदवार दिल्यानं आता अमरावती लोकसभा मतदारसंघातील लढत अतिशय रंजक ठरण्याची शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज