शेतकरी उतरला रस्त्यावर, कर्जमाफीसाठी अहिल्यानगरमध्ये प्रहारचे ‘चक्काजाम’ आंदोलन

Prahar Protest: विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षाकडून शेतकऱ्यांचा (Farmer) सातबारा कोरा करणार, शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार तसेच दिव्यांगांचे मानधन वाढविणार, असे आश्वासन दिले होते. परंतु प्रत्यक्षात मात्र आज सत्तेत असताना देखील शेतकऱ्यांची कर्जमाफी, त्यांचा सातबारा अजूनही कोरा झालेला नाही. यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी आक्रमक पावित्रा घेतला. त्यांच्या नेतृत्वाखाली आज राज्यभरात चक्काजाम आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला संपूर्ण राज्यात जोरदार प्रतिसाद मिळतोय. अहिल्यानगरमध्येही (Ahilyanagar) आज चक्का जाम आंदोलन करण्यात आलं.
मी किर्तनात अन् भाऊ कलाकेंद्रात ऐकून शॉक… दौंड कला केंद्र गोळीबारावर आमदार मांडेकरांची प्रतिक्रिया
प्रहारचे जिल्हाध्यक्ष विनोद परदेशी (Vinod Pardeshi) यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर शहरात रस्ता रोको आंदोलन करण्यात आलं. नगर – पुणे महामार्गावरील कायनेटिक चौकात हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता. आंदोलनादरम्यान काही काळ रस्त्यावर वाहनाच्या मोठ्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं. या चक्काजाम आंदोलनाला जिल्ह्यात मोठा प्रतिसाद मिळाला. अनेक शेतकऱ्यांनी या आंदोलनता सक्रीय सहभाग घेतला होता.
‘देवाच्या झोळीत हात, शनि देवाचा प्रकोप त्यांना…’; मंत्री विखेंचा पुन्हा गडाखांवर निशाणा
चक्काजाम आंदोलनामुळे रस्त्यावर रांगा लागल्या होत्या. त्यामुळं रस्त्यावर वाहतूक खोळंबली होती. पोलिसांनी आंदोलकांना महामार्ग मोकळा करण्याची विनंती केली होती, मात्र कार्यकर्ते रस्त्यावरून हटायला तयार नव्हते. तर सरकारच्या फसव्या आश्वासनांचा आणि कृषिमंत्र्यांचा निषेध करण्यासाठी आंदोलकांनी रस्त्यावरच पत्त्यांचा डाव मांडला होता.
या आंदोलनाला शेतकऱ्यांसह अनेक संघटनांनी देखील पाठिंबा दिला होता. शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला पाहिजे, फडणवीस साहेब जागे व्हा, जागे व्हा, अशा घोषणा यावेळी कार्यकर्त्यांनी केल्या. कार्यकर्त्यांनी हातात फलक घेऊन महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. कार्यकर्ते आक्रमक झाल्याने पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतलं आणि वाहतूक सुरळीत केली.
यावेळी ताब्यात घेतलेल्या कार्यकर्त्यांनी मागण्या पूर्ण न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सरकारला दिला.
…तर मंत्रालयावर धडकणार
यावेळी बोलतांना परदेशी म्हणाले, आजच्या चक्काजाम आंदोलनाला सर्वपक्षीय नेत्यांचा पाठिंबा आहे. सरकारने सातबारा कोरा करू, असं सांगितलं होतं. मात्र, अद्यापही घोषणेवर कार्यवाही होत नाही. सरकारच्या धोरणांविरोधात संपूर्ण महाराष्ट्रात शेतकरी एकटवला आहे. सरकारने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर मंत्रालयावर मोर्चा काढू, असा इशारा त्यांनी दिला. तसेच माणिकराव कोकाटे सभागृहात रमी खेळतात, त्यांना लाज वाटायला पाहिजे, असंही परदेशी म्हणाले.