अमरावती लोकसभा मतदारसंघ कॉंग्रेसलाच सुटला पाहिजे; यशोमती ठाकूर आग्रही

अमरावती लोकसभा मतदारसंघ कॉंग्रेसलाच सुटला पाहिजे; यशोमती ठाकूर आग्रही

Yashomati Thakur’s demand ‘Congress should be nominated in Amravati’ : दिवंगत भाजप खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर कॉंग्रेसने (Congress) दावा ठोकला. मात्र, मविआत ज्या पक्षाची ताकद जास्त आहे, त्या पक्षाला ती जागा लढवता येईल, पुण्यात कॉंग्रेसपेक्षा राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे, असं राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी सांगितलं. त्यामुळं पुण्यातील लोकसभा पोटनिवडणुकीवरून मविआत (Mahavikas Aghadi) रस्सीखेच सुरू झाल्याचे पाहायला मिळते. अशातच आता अमरावती लोकसभा मतदार संघाच्या (Amravati Lok Sabha Constituency) जागेवरही दावे केले जात आहेत. अमरावती लोकसभा मतदार संघावर कॉंग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी दावा केला.

काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. पक्षाने संधी दिल्यास अमरावती मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याचे मिटकरी यांनी सांगितले होते. आता यशोमती ठाकूर यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघावर काँग्रेसचा दावा असून अमरावतीत काँग्रेसला उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली.

याविषयी बोलतांना यशोतमी ठाकूर यांनी सांगितले की, पूर्ण जिल्ह्याचा आढावा घेतला तर असं दिसेल की, इथं कॉंग्रेस पक्षाचं वर्चस्व आहे. अमरावती मतदार संघात कॉंग्रेसची ताकद ही जास्त आहे. त्यामुळं या मतदार संघातून कॉंग्रेसला उमेदवारी द्यावी, अमरावती लोकसभा मतदारसंघ कॉंग्रेसला सुटला पाहिजे, असं यशोतमी ठाकूर यांनी सांगितलं.

“किरीट सोमय्यांना नाक घासून माफी मागावी लागेल…” : दिलासा मिळताच अनिल परबांचे आव्हान!

दोन दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनीही अमरावती मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढणार असल्याचे सांगितले होते. आणि आता अमरावती बाजार समितीच्या निवडणुकीत भाजप आणि युवा स्वाभिमानच्या पॅननला पराभवाची धूळ चारणाऱ्या यशोमती ठाकूर यांनीही अमरावती लोकसभा मतदार संघावर दावा केला. दरम्यान, या मतदार संघातून मविआतील कोणता पक्षाला उमेदवारी मिळणार हेच पाहणं महत्वाचं आहे. एवढं मात्र खरं की, आगामी लोकसभा नवनीत राणा यांच्यासाठी मोठी कसरत ठरणार आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube