“किरीट सोमय्यांना नाक घासून माफी मागावी लागेल…” : दिलासा मिळताच अनिल परबांचे आव्हान!
दापोली येथील साई रिसॉर्ट प्रकरणी शिवसेना (UBT) नेते अनिल परब (Anil Parab) यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यांनी स्वतः या प्रकरणी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. या प्रकरणात काहीही तथ्य नसल्याचे म्हणतं हरित लवादाने हे प्रकरण डिसमिस केले आहे. त्यानंतर या प्रकरणात भाजप (BJP) नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे, असेही परब यांनी सांगितले. यानंतर आता सोमय्या यांना एकतर नाक घासावा लागेल किंवा 100 कोटींच्या केलेल्या दाव्यानुसार 100 कोटी द्यावे लागतील, असं आव्हानही यावेळी परब यांनी दिला. (Shiv Sena (UBT) leader Anil Parab Sai resort case update)
काय म्हणाले अनिल परब?
मी सुरवातीपासून साई रिसॉर्ट प्रकरणात माझा काही संबंध नाही हे सांगत होतो. हे रिसॉर्ट माझ्या मित्राचे आहे. त्यांना मी जागा विकली होती. या प्रकरणात सुरुवातीपासून माझ्यावर जाणूनबुजून खोटे आरोप करण्यात आले. मी पैसे लावले, पर्यावरणाचा ऱ्हास केला, सांडपाणी रिसॉर्टमध्ये जाते असे विविध आरोप करण्यात आले. एका खासगी तक्रारीच्या आधारे ईडीने माझी चौकशी केली. दीड वर्ष नाहक बदनामी झाली.
नरेंद्र मोदींपासून लोकशाहीला धोका नाही, ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षितांचे थेट उत्तर
काल हरित लवादाने या प्रकरणात काहीही तथ्य नसल्याचे म्हणतं आम्ही हे प्रकरण डिसमिस करत आहोत असे सांगितले. त्यानंतर अब्रू जाईल म्हणून सोमय्यांनी याचिका मागे घेतली. सोमय्या नेहमी प्रमाणे खोटे आरोप करतात आणि आरोप अंगलट येत आहेत हे लक्षात आले की सोडून देतात. समुद्रात सांडपाणी जाते हे कुभांड रचलं गेलं, पण जे रिसॉर्ट सुरू झालेले नाही आहे त्याचे सांडपाणी समुद्रात कसे जाईल? याबाबतचा रिपोर्ट प्रदूषण नियंत्रण मंडळाने, शासनाने, दिल्लीतील प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिला, ईडीच्या अधिकाऱ्यांनीही याबाबतचा अहवाल दिला आहे.
अहमदनगरसह ‘या’ जिल्ह्यांसाठी आगामी 48 तास अत्यंत महत्वाचे…जाणून घ्या कारण
या आरोपात तथ्य नाही हे लक्षात येताच अर्धी इमारत असताना पूर्ण इमारतीचा टॅक्स घेतला असा गुन्हा दाखल केला. पण तोही खोटा गुन्हा आहे. आम्ही ते हायकोर्टात सिद्ध करू. आता एकतर या याचिकाही मागे घेतल्या जातील किंवा आम्ही निर्दोष सिद्ध होऊ. सर्व खटल्यांमध्ये मला न्याय मिळेल यावर माझा विश्वास आहे, असेही परब म्हणाले.