मोठी बातमी : निलेश लंकेंच्या हाती तुतारी ! आमदारकीचा राजीनामा, विखेंविरोधात रिंगणात

  • Written By: Published:
मोठी बातमी : निलेश लंकेंच्या हाती तुतारी ! आमदारकीचा राजीनामा, विखेंविरोधात रिंगणात

Nilesh Lanke : आमदार निलेश लंके (Nilesh Lanke) यांनी अखेर अजित पवार यांची साथ सोडली आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात दाखल झाले आहेत. आता ते तुतारी चिन्हावर लोकसभा (Loksabha Election) निवडणूक लढविणार आहेत.मी देव पाहिला नाही मात्र देवासारखा श्रेष्ठ माणूस म्हणजे शरद पवार आहेत. पवारांनी सांगितलं लोकसभा लढवावी लागेल, मी म्हणालो ठीक आहे. आता शरद पवारांचा मार्गदर्शनाखाली लोकसभा लढविणार असल्याचे निलेश लंके यांनी जाहीर केले.

तसेच चार महिन्यापूर्वीच कटू निर्णय घ्यावा लागणार असे सांगत विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा लागणार, असे त्यांनी घोषित केले. विधानसभा अध्यक्षांकडे आमदारकीची राजीनामा मेलद्वारे पाठविणार असल्याचे लंके यांनी जाहीर केले. ही घोषणा करताना लंके हे भावूक झाले.

त्यामुळे अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान खासदार सुजय विखेविरुद्ध (Sujay Vikhe) निलेश लंके अशी लढत होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नगरमध्ये शरद पवार विरुद्ध विखे कुटुंब असा जोरदार सामना रंगणार आहे.
पारनेरमधील सुपा येथे आमदार निलेश लंके यांनी आज कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात त्यांनी तुतारी चिन्हावर लोकसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे.


Lok Sabha Election : आता माघार नाही! ‘त्या’ जागांसाठी काँग्रेस मित्रपक्षांना देणार टक्कर?


विखे पिता-पुत्रांवर जोरदार हल्लाबोल

निलेश लंके यांनी कार्यकर्ता मेळाव्यात पालकमंत्री राधाकृष्ण विखे, सुजय विखे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. त्यांनी मला संपविण्याचा घाट घातला होता. माझ्या अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले आहेत. तुमच्या पीएने पंधरा टक्कांनी पैसे जमा केले आहेत. तुमच्या पीएलाही पीए आहेत, असा आरोपही लंके यांनी केला आहे. तुम्ही एक तरी जिल्ह्यात मेडिकल कॉलेज आणले का ? केवळ आपले मेडिकल कॉलेज व आपली यंत्रणा चालविण्याचे काम ते करत आहेत.

बंडाचा सूर मावळला का?; सस्पेन्स कायम ठेवत शिवतारे उद्या जाहीर करणार पुढची दिशा


पारनेरकरांना थेट भावनिक आवाहन

या निवडणुकीला आपल्याला सामोरे जायचे आहे. ही पारनेरकरांची अस्तित्वाचे लढाई आहे. प्रत्येकांनी मी उमेदवार म्हणून बाहेर पडले पाहिजे. गावाचे गावे पॅक करा. आपल्या तालुक्याची अस्तित्वाचे लढाई आहे, असे आवाहन निलेश लंके यांनी केली आहे. ते येतील पैसे देतील. पैसे घेऊन जा, अशी सांगायची भूमिका घ्या. आता उघड्या डोळ्याने पाहून उपयोग नाही. प्रत्येकाने निवडणूक हाती घेतली पाहिजे. कुठल्याही परिस्थितीत निवडणूक जिंकायची आहे, असे भावनिक आवाहन निलेश लंके यांनी केले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज