बंडाचा सूर मावळला का?; सस्पेन्स कायम ठेवत शिवतारे उद्या जाहीर करणार पुढची दिशा
Vijay Shivtare : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याविरुद्ध दंड थोपटणारे माजी आमदार विजय शिवतारे यांची नाराजी (Vijay Shivtare) कमी झाली आहे का, या प्रश्नाचं उत्तर अजून मिळालेलं नाही. राजकारणा कुणी कुणाचा शत्रू नसतो. अपक्ष लढण्याचा निर्णय एकट्याने घेऊ शकत नाही. याबाबत उद्या बैठक घेणार असून त्यानंतर पुढं काय करायचं ते ठरवू, असे वक्तव्य माजी आमदार विजय शिवतारे यांनी आज केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर शिवतारे यांनी खरंच माघार घेतली का,असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
माजी मंत्री शिवतारे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबरील (Devendra Fadnavis) बैठकीत काय झालं, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर शिवतारे म्हणाले, सागर बंगल्यावरील बैठकीत नेमकी काय चर्चा झाली याची माहिती उद्याच्या बैठकीत देऊ असे शिवतारे म्हणाले.
विजय शिवतारे यांचे बंड शमले : अजितदादा यांच्या शेजारी उभे राहून खळखळून हसले
दरम्यान, विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यात जुन्या वादाची किनार असली तरीही यंदा बारामतीमध्ये शरद पवार (Sharad Pawar) यांना पराभूत करायचे असल्याने हा वाद मिटविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील अशा सगळ्या नेत्यांनी मध्यस्थी केली होती. पण शिवतारे माघार घ्यायला तयार नव्हते. अखेरीस सर्वच नेत्यांनी प्रयत्न करुन शिवतारे यांची मनधरणी केली. त्यानंतर शिवतारे यांनी माघार घेतल्याचे सांगितले जात होते.
परंतु, त्यांंनी माध्यमांशी बोलताना अजूनही या वादावर सस्पेन्स कायम ठेवला आहे. अपक्ष लढण्याचा निर्णय एकट्याने घेऊ शकत नाही. याबाबत उद्या बैठक घेणार असून त्यानंतर पुढं काय करायचं ते ठरवू, असे वक्तव्य माजी आमदार विजय शिवतारे यांनी आज केले.
Vijay Shivtare : फुरसुंगी आणि उरुळी गावाला पाच वर्षात काय मिळालं? मुख्यमंत्र्यांचा निर्णय महत्वपूर्ण