विजय शिवतारे यांचे बंड शमले : अजितदादा यांच्या शेजारी उभे राहून खळखळून हसले

विजय शिवतारे यांचे बंड शमले : अजितदादा यांच्या शेजारी उभे राहून खळखळून हसले

मुंबई : अखेर शिवसेनेचे माजी आमदार विजय शिवतारे यांचे बंड शमले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) या महायुतीतील तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची शिवतारे यांच्यासोबत मध्यरात्री बैठक पार पडली. त्यानंतर चौघांचे एकत्रित फोटोही व्हायरल झाले आहेत. त्यामुळे आता लोकसभा निवडणुकीत बारामतीमधून राष्ट्रवादीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसून येत आहे. (CM Eknath Shinde, DCM Devendra Fadnavis and Ajit Pawar came to an understanding by removing Vijay Shivtare’s displeasure.)

काय होता वाद?

“बारामती लोकसभा मतदारसंघ कोणाचा सातबारा नाही. आता बदला घेण्याची वेळ आलीय… अजितदादांची गुर्मी जाणार नाही… आता माघार घेणार नाही… अशी एकापेक्षा एक आक्रमक विधान करत विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार यांच्याविरोधात शड्डू ठोकला होका. शिवतारेंच्या अपक्ष उमेदवारीच्या घोषणेमुळे येथे तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे अजित पवार यांचे टेन्शन वाढले होते.

शिवतारे यांच्या या शड्डूला जुन्या वादाची किनार असली तरीही यंदा बारामतीमध्ये शरद पवार यांना पराभूत करायचे असल्याने हा वाद मिटविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील अशा सगळ्या नेत्यांनी मध्यस्थी केली होती. पण शिवतारे माघार घ्यायला तयार नव्हते. अखेरीस सर्वच नेत्यांनी प्रयत्न करुन शिवतारे यांची मनधरणी केल्याचे दिसून येत आहे. शिवतारे उद्या पत्रकार परिषद घेऊन सुनेत्रा पवार यांना पाठींबा जाहीर करण्याची शक्यता आहे.

हर्षवर्धन पाटलांचीही समजूत काढण्यात यश :

आधी विधानसभेचा शब्द द्या, मगच लोकसभेचे काम करणार अशी भूमिका घेत बारामती मतदासंघासाठी इंदापूरमधून भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी अजित पवार यांचे काम करण्यास नकार दिला होता. दत्तात्रय भरणे यांच्यारुपाने इंदापूर हा अजित पवार यांचा हक्काचा बालेकिल्ला तयार झाला आहे. भरणेंनी इथून दोनवेळा राष्ट्रवादीच्या चिन्हावर विजय मिळविला आहे. त्यामुळे हा मतदारसंघ पाटील यांच्यासाठी कसा सोडायचा असा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. त्यासाठी पाटील यांच्यासोबत चंद्रकांत पाटील आणि अजित पवार यांनी स्वतः बैठक घेतली होती. मात्र तोडगा निघू शकला नव्हता.

‘नाशिक लोकसभा मतदारसंघ आमचाच’; हेमंत गोडसेंनी ठणकावूनच सांगितलं

त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांची समजूत काढणे हे देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासाठी मोठे आव्हान बनले होते. अखेर शनिवारी सागर बंगल्यावर फडणवीस यांनी दटावण्याच्या स्वरात येऊनच “विधानसभेसंदर्भात वेळ आल्यावर निर्णय घेऊ. आता लोकसभेच्या उमेदवाराचा प्रचार करा,” असे पाटील यांना निर्देश दिले आहेत. बारामतीतील महायुतीचा जो उमेदवार असेल त्यासाठी काम करा. महायुतीच्या उमेदवारा विरोधात कोणताही प्रचार करू नका. समर्थकांनाही तशी समज द्या, असे निर्देश त्यांनी हर्षवर्धन पाटील यांना दिले आहेत.

 

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube