‘नाशिक लोकसभा मतदारसंघ आमचाच’; हेमंत गोडसेंनी ठणकावूनच सांगितलं
Hemant Godse : नाशिक लोकसभेच्या (Nashik Loksabha) जागेवरुन महायुतीत रणकंदन सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे हेमंत गोडसे (Hemant Gosde) हे विद्यमान खासदार आहेत. मात्र, मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीकडूनही नाशिकच्या जागेसाठी जोरदार प्रयत्न सुरु असल्याचं दिसून येत आहेत. अशातच आता अजित पवार गटाकडूनही नाशिकच्या जागेवर दावा ठोकण्यात आला आहे. अशातच हेमंत गोडसे यांनी नाशिक लोकसभा पारंपारिकरित्या शिवसेनेकडेच राहणार असल्याचं ठणकावूनच सांगितलं आहे. त्यामुळे आता महायुतीसमोर नाशिकच्या जागेचा मोठा पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.
Thakishi Sanvad : जागतिक रंगभूमी दिनाचं औचित्य अन् गिरिजा ओककडून नव्या नाटकाची घोषणा
हेमंत गोडसे म्हणाले, नाशिकची जागा पारंपरिक रित्या शिवसेनेकडे राहिली आहे. 2 दिवसांपूर्वी सुद्धा आम्ही ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. आम्हाला देखील विश्वास आहे की मुख्यमंत्री ही जागा शिवसेनेला सोडवून घेतील. छगन भुजबळांकडून अशी मागणी होत असेल पण विद्यमान खासदार ज्या पक्षाचे असतात त्यांना जागा सोडली जात असते त्यामुळे मुख्यमंत्री जागा घेतील असा आम्हाला विश्वास असल्याचं हेमंत गोडसेंनी स्पष्ट केलं आहे.
Lok Sabha Election: मोदींसाठी आरएसएस कशी ताकद लावतंय ? कसं आहे मायक्रो प्लॅनिंग
दरम्यान, नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे हे तसे शांत आणि संयमी समजले जातता. आधी मनसे आणि आता शिवसेना अशा पक्षांमध्ये काम करुनही गोडसे इतर आमदार-खासदारांप्रमाणे कधी आक्रमक झालेले ऐकीवात नव्हते. गत दोन दिवसांपासून मात्र ते आक्रमक झालेले दिसून येत आहेत. त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी जाऊन ठिय्या दिला. दादा भुसे आणि गोडसे यांच्यातील सुप्त संघर्ष नवीन नाही. पण ते भुसेही गोडसेंसोबत या ठिय्यामध्ये होते.
काही दिवसांपूर्वी एका जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांचे पुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी नाशिकमधून हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीची केलेली घोषणा केली होती. पण गोडसे यांच्यारुपाने सेनेच्या ताब्यातील हा मतदारसंघ खेचून घेण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी ही घोषणा रुचली नाही. गोडसे यांच्यावर युतीधर्म पाळला नसल्याचे टिकास्त्र सोडले. भाजप एकतर उमेदवार बदला अन्यथा, जागा आम्हाला द्या, या भूमिकेवर अडून बसल्याचे सांगितले जाते.