Lok Sabha Election: मोदींसाठी आरएसएस कशी ताकद लावतंय ? कसं आहे मायक्रो प्लॅनिंग

  • Written By: Published:
Lok Sabha Election: मोदींसाठी आरएसएस कशी ताकद लावतंय ? कसं आहे मायक्रो प्लॅनिंग

Lok Sabha Election And rss worker : देशात लोकसभेचे बिगुल (Lok Sabha Election) वाजले आहे. नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी भाजपने चारशे जागांचा नारा दिलाय. यासाठी भाजप कामाला लागली आहे. यात राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा (आरएएस)चा महत्त्वाचा रोल असणार आहे. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ थेटपणे भाजपच्या उमेदवाराचा (BJP) प्रचार करत नाही. परंतु रणनिती ही भाजपला अधिकधिक मतदान मिळवून देण्याची असते. त्यामुळे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा एकाच नाणाच्या दोन बाजू असल्याचे मानले जाते. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू सलग तीनदा देशाचे पंतप्रधान झाले आहेत. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यास त्यांची बरोबरी होईल. त्यासाठी संघ परिवारीतील तब्बल 36 संघटनांना कामाला लागल्या आहेत. या संघटना काय करणार आहे. संघाची भाजपला अर्थात मोदींना कशी मदत होणार हे जाणून घेऊया…

‘मी काकाच्या जीवावर मोठा झालो नाही’; कोल्हेंचा अजितदादांना सणसणीत टोला


राष्ट्रीय स्वंयसेवक संघ-

राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे देशभर मोठे जाळे आहे. भाजपचा प्रभाव नसलेल्या भागातही राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे स्वंयसेवक आहेत. देशभर पसरलेल्या शाखांमधील स्वंयसेवकाने भाजपला तिसऱ्यांदा सत्ता मिळवून देण्यासाठी कंबर कसलीय. तर संघ परिवराशी निगडीत 36 संघटना भाजपचा अप्रत्यक्षपणे प्रचार करणार आहेत. त्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ, भारतीय किसान संघ, सेवा भारती, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, हिंदू स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रीय मुस्लिम मंच, सहकार भारती अशा प्रमुख संघटना आहेत. या संघटना मतदानाबाबत जनजागृती करणार आहे.

हिंदुत्वाचा मुद्दा सांगणार ?

संघ परिवरातील संघटना भाजप सत्तेत आल्यानंतर दहा वर्षांत झालेले महत्त्वाचे निर्णय सांगणार आहेत. त्यात राम मंदिर, ३७० हटविणे, सीएए तसेच देशासाठी भाजप का महत्त्वाचे आहे हे मतदारांना पटवून देणार आहे. त्यात अनेक राष्ट्रीय मुद्दे असणार आहेत. त्यासाठी देशभरात मंदिरांमध्ये मेळावे घेतले जाणार आहेत. तसेच ए्प्रिल महिन्यात गुढीपाडवा आहे. त्याचा उपयोग प्रचारासाठी करून घेतला जाणार आहे.

मतदान घडवून आणणे

प्रत्येक पक्षाची एक व्होट बँक असते. तशीच भाजपला मानणारे एक व्होट बँक आहे. भाजपशी निगडीत संघटनांचे मते आहेत. हे मतदान सकाळी अकरापर्यंत हे मतदान घडवून आणायचे आहे. त्यासाठी राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि संघ परिवरातील 36 संघटनांच्या बैठका झाल्या आहेत. जिल्हा, तालुकास्तरावर या बैठका झाल्या आहेत. त्यात या संघटनांना मानणाऱ्या मतदारांचे मतदानही सकाळी अकरापर्यंत घडवून आणायचे आहे.
स्वयंसेवक संघाचा अनेक रणनिती असतात. कधी त्या एकदम छुप्या असतात. त्यातील पदाधिकाऱ्यांना ही रणनिती माहित असते. त्यातील काहीच रणनिती बाहेर आल्या आहेत.

‘घड्याळाला मत म्हणजे PM मोदींना मत’; मोदींच्या समर्थनात अजितदादा मैदानात

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube