‘घड्याळाला मत म्हणजे PM मोदींना मत’; मोदींच्या समर्थनात अजितदादा मैदानात

‘घड्याळाला मत म्हणजे PM मोदींना मत’; मोदींच्या समर्थनात अजितदादा मैदानात

Ajit Pawar News : घड्याळाला मत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना मत, असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Pm Narendra Modi) समर्थनात प्रचाराला सुरुवात केली आहे. दरम्यान, शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज अजित पवार गटात प्रवेश केला. प्रवेशानंतर अजित पवार जाहीर सभेत बोलत होते. यावेळी अजित पवार यांनी विरोधकांवर सडकून टीकेसह महायुतीच्या प्रचाराला सुरुवात केल्याचं दिसून आलं.

अजित पवार गटाला सात जागा मिळणार? सातारा, परभणी, नाशिकच्या जागेवर ठोकला दावा

अजित पवार म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपल्याला सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवायचे आहे. मतदारसंघातल्या लोकांना आता समजावून सांगावं लागेल की हे घड्याळ मोदींना पंतप्रधान करण्यासाठी चाललं आहे. भोसरी, हडपसर भागातील मतदारांना सांगाव लागेल की हे घड्याळ मोदींना पाठिंबा देण्यासाठी चाललं असल्याचं अजितदादांनी स्पष्ट केलं आहे.

‘राणेंना निवडून दिलं तर जिल्ह्याचं मंत्रिपद फिक्स’; केसरकरांच्या वक्तव्याने सामंतांना धडकी

शहरी भागातील काही मतदारांना माहित नसलं, तर ते मतदार घड्याळ चिन्ह पाहुन पुन्हा माघारी फिरतील अशा मतदारांना आपल्याला समजावून सांगावं लागणार आहे. आम्ही महायुतीकडून काही जाहीरातीही देणार आहे, मोदींना मत म्हणजे धनुष्यबाण, घड्याळ अन् कमळाला मत, अशा जाहीराती देणार असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं आहे.

ईडीमध्ये अधिकारी होण्याची संधी, महिन्याला 1,51,000 रुपये पगार, कधीपर्यंत करता येणार अर्ज?

विरोधक निवडणूक आले की संविधान बदलणार अशी अफवा पसरवतात. राहुल गांधींनी मुंबईच्या सभेत सांगितलं की संविधान कोणीही बदलू शकत नाही. शिव शाहू फुले आंबेडकरांचे विचारधारा हीच आमची विचारधारा असल्याचंही अजित पवार म्हणाले आहेत. विरोधक सांगताहेत की संविधान बदलणार आहे.

सलग दोनदा पराभव, तिसऱ्यांदा PM मोदींना देणार टक्कर; वाराणसीच्या मैदानातील अजय राय कोण?

मी सांगतो जोपर्यंत चंद्र सुर्य आहे तोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधानाचे शिल्पकार असतील. पुढील काळात निवडणूक होणार नसल्याचाही सूर विरोधकांकडून आवळण्यात येत आहे. तर मग निवडणूका नाही झाल्या तर भारताची जनता काही गप्प बसणार आहे का? असा सवालही अजित पवार यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube