सलग दोनदा पराभव, तिसऱ्यांदा PM मोदींना देणार टक्कर; वाराणसीच्या मैदानातील अजय राय कोण?

सलग दोनदा पराभव, तिसऱ्यांदा PM मोदींना देणार टक्कर; वाराणसीच्या मैदानातील अजय राय कोण?

Varanasi Congress Candidate Ajay Rai : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने उमेदवारांची दुसरी यादी (Congress Candidates List) जाहीर केली आहे. या यादीत एकूण 46 उमेदवारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील चार मतदारसंघांचा समावेश आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे दिग्गज नेते नितीन गडकरी यांच्या (Nitin Gadkari) विरोधात आमदार विकास ठाकरे यांना काँग्रेसने मैदानात उतरवले आहे. तर दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या विरोधातही काँग्रेसने उमेदवार फायनल केला आहे. काँग्रेसने उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष अजय राय यांना (Ajay Rai) उमेदवारी दिली आहे.

मागील निवडणुकीतही अजय राय यांनीच पीएम मोदींना टक्कर दिली होती. आताही काँग्रेसने पुन्हा त्यांच्यावरच विश्वास दाखवला आहे. मागील निवडणुकीत अजय राय दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते. यंदा काँग्रेसने त्यांनाच मैदानात उतरवले आहे. अजय राय उत्तर प्रदेशातील काँग्रेसचे मोठे नेते म्हणून ओळखले जातात. विशेष म्हणजे त्यांनी याआधी 2014 आणि 2019 या दोन्ही लोकसभा निवडणुकीत मोदींविरोधात उमेदवारी केली आहे. आता तिसऱ्यांदा ते मोदींना टक्कर देण्यासाठी मैदानात उतरले आहेत.

Lok sabha Election : नितीन गडकरींविरोधात विकास ठाकरे, काँग्रेसची दुसरी यादी जाहीर

2019 च्या निवडणुकीत मोदींनी समाजवादी पार्टीच्या शालिनी यादव यांना 4 लाख 80 हजार मतांच्या फरकाने मात दिली होती. या निवडणुकीत काँग्रेसच्या अजय राय यांना 1 लाख 52 हजार 548 मते मिळाली होती. ते तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. या निवडणुकीत मोदींना 63.62 टक्के तर अजय राय यांना 14.38 टक्के मते मिळाली होती. 2014 च्या निवडणुकीतही अजय राय मोदींविरोधात रिंगणात होते. या निवडणुकीत अजय राय दुसऱ्या क्रमांकावर राहिले होते.

अजय राय यांची राजकीय कारकिर्द 

अजय राय यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतून राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. काँग्रेसमध्ये प्रवेश घेण्याआधी अजय राय यांचे भाजपबरोबर जुने नाते होते. पूर्व उत्तर प्रदेशात भाजपाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी कधीकाळी काम केले होते. अजय राय वाराणसीतून पाच वेळेस आमदार राहिले आहेत. यातील तीन टर्म ते भाजपाचेच आमदार  राहिले आहेत. 54 वर्षीय अजय राय भुमिहार समाजातून येतात. या समाजाचे वाराणसीच्या आसपासच्या जिल्ह्यांत प्राबल्य आहे. मुख्तार अन्सारी यांच्या बरोबरील त्यांचे राजकीय शत्रुत्व जगजाहीर आहे.

अजय राय यांनी 1996 मध्ये राजकारणात एन्ट्री घेतली. त्यांनी कोलासला मतदारसंघातून भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे नऊ वेळचे आमदार उदल यांचा पराभव केला होता. 2002 मध्ये याच मतदारसंघातून ते पुन्हा विजयी झाले होते. मायावती यांच्या नेतृत्वातील भाजप – बसपा सरकारमध्ये अजय राय सहकरिता राज्य मंत्री होते. 2009 मधील लोकसभा निवडणुकीत अजय राय यांनी भाजपकडे उमेदवारी मागितली होती.

Lok sabha Election : सांगलीत विशाल पाटीलच लढत देतील; काँग्रेस ठाकरेंची मनधरणी करणार!

परंतु भाजपने त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत मुरली मनोहर जोशी यांना तिकीट दिले. यामुळे नाराज झालेल्या अजय राय यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. समाजवादी पार्टीने त्यांना उमेदवारी दिली. परंतु या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला. पुढे 2012 मध्ये त्यांनी काँग्रेसबरोबर राजकारणाला सुरुवात केली. काँग्रेसच्या तिकिटावर पिंडरा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि जिंकले. त्यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान पदाचा चेहरा असलेले नरेंद्र मोदी यांना रोखण्यासाठी काँग्रेसने त्यांना वाराणसी मतदारसंघातून तिकीट दिले.

दरम्यान, काँग्रेसने 543 लोकसभा मतदरसंघांपैकी 185 मतदारसंघात उमेदवारांची घोषणा केली आहे. काँग्रेसने चौथ्या यादीत अनेक दिग्गज नेत्यांना तिकीट दिले आहे. या यादीत मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंह यांना राजगढ मतदारसंघातून तिकीट दिले आहे. आमदार विकास ठाकरे यांना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या विरोधात नागपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. परंतु अरविंद केजरीवाल यांचीही एन्ट्री झाली. त्यामुळे या निवडणुकीत अजय राय यांना तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. नंतर 2019 च्या निवडणुकीत सुद्धा नरेंद्र मोदी यांनी अजय राय यांचा मोठ्या मतांच्या फरकाने पराभव केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज