‘बाळासाहेबां’चं व्यक्तिमत्व सामाजिक-राजकीयदृष्ट्या प्रभावी; पंतप्रधान नरेंद्र मोदींची आदरांजली…

'बाळासाहेबां'चं व्यक्तिमत्व सामाजिक-राजकीयदृष्ट्या प्रभावी, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहिली.

Untitle (13)

Pm Narendra Modi : ‘बाळासाहेबां’चं व्यक्तिमत्व सामाजिक-राजकीयदृष्ट्या प्रभावी, या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi )यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिलीयं. जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन पोस्ट शेअर केलीयं.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन पोस्ट शेअर करीत अभिवादन केलंय. तीक्ष्ण बुद्धिमत्ता, प्रभावी वक्तृत्व आणि ठाम विचारसरणीसाठी ओळखले जाणारे बाळासाहेब ठाकरे यांचं एक अद्वितीय नाते जपून असल्याचा उल्लेख पंतप्रधान मोदी यांनी पोस्टमध्ये केला आहे.

वडेट्टीवार गप्प बसेनात…. नागपूरमधील महापौरपदाच्या आरक्षणावरून थेट फडणवीस यांना घेरले

पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, “महाराष्ट्राच्या सामाजिक-राजकीय परिदृश्यावर खोलवर प्रभाव टाकणारे दिवंगत मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त, या दिग्गज व्यक्तिमत्त्वाला भावपूर्ण आदरांजली. तीक्ष्ण बुद्धिमत्ता, प्रभावी वक्तृत्व आणि ठाम विचारसरणीसाठी ओळखले जाणारे बाळासाहेब जनतेशी एक अद्वितीय नाते जपून होते. राजकारणाबरोबरच त्यांना संस्कृती, साहित्य आणि पत्रकारितेचीही विशेष आवड होती. व्यंगचित्रकार म्हणून त्यांच्या कारकिर्दीत समाजाचे सूक्ष्म निरीक्षण आणि विविध विषयांवरील निर्भय भाष्य दिसून येते. महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी त्यांच्या दृष्टिकोनातून आम्हाला मोठी प्रेरणा मिळते आणि ती साकार करण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील राहू” असं पंतप्रधानांनी लिहिलंय.

follow us