Congress : PM मोदींचं कौतुक अन् काँग्रेस विरोधात वक्तव्य; मोठ्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी

Congress : PM मोदींचं कौतुक अन् काँग्रेस विरोधात वक्तव्य; मोठ्या नेत्याची पक्षातून हकालपट्टी

Congress News : मागील काही दिवसांपासून पक्षावर (Congress) नाराज असलेले आणि आपल्याच पक्षाला अडचणीत आणणारी विधााने करणारे काँग्रेस नेते आचार्य प्रमोद कृष्णम (Acharya Pramod Krishnam) यांच्यावर अखेर कारवाई झाली आहे. पक्ष शिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत आचार्य प्रमोद कृष्णम यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. 2019 मध्ये लखनऊ लोकसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढली होती. काही दिवसांपासून ते सातत्याने काँग्रेसविरोधात वक्तव्ये देत होते. राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या (Ram Mandir Pran Prathistha) सोहळ्यावेळीही त्यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक (PM Narendra Modi) केले होते. काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी त्यांना कारवाईचे पत्र दिले.

आचार्य प्रमोद कृष्णम वारंवार पक्षविरोधी विधाने करत असल्याच्या तक्रारी आमच्याकडे येत होत्या. या तक्रारींची दखल घेऊन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी त्यांना सहा वर्षांसाठी निलंबित केले आहे, अशी माहिती वेणुगोपाल यांनी माध्यमांना दिली. आचार्य प्रमोद कृष्णम काँग्रेस विरोधात वक्तव्ये देत होते. टीव्ही चॅनेल्सच्या डिबेटमध्येही ते बऱ्याचदा भाजपाची स्तुती करताना आणि पंतप्रधान मोदी यांचं कौतुक करताना दिसत होते. मोदी पंतप्रधान नसते तर कदाचित राम मंदिराचं निर्माण झालं नसतं असेही वक्तव्य त्यांनी मध्यंतरी केले होते.

Ram Mandir : रामलल्लांच्या चरणी 3.17 कोटींचं दान; 2 दिवसांत 7.5 लाख भक्तांनी घेतलं दर्शन

इतकेच नाही तर 19 फेब्रुवारी रोजी संभलमधील कल्की धाम मंदिराचं भूमिपूजन करण्यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित केलं आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यालाही त्यांनी हजेरी लावली होती. याउलट काँग्रेसने निवेदन प्रसिद्ध करत या सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याचे स्पष्ट केले होते. राम मंदिराचे बांधकाम थांबवण्याचे अनेक प्रयत्न झाले त्यामुळे सनातन धर्माला मानणाऱ्या कोट्यावधी लोकांच्या श्रद्धेला तडा गेला हे सगळ्या जगाला माहिती आहे, असेही आचार्य प्रमोद कृष्णम म्हणाले होते.  त्यांच्या याच वक्तव्यांमुळे काँग्रेसची मोठी अडचण होत होती. अखेर त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारत त्यांना पक्षातून निलंबित करण्यात आले.

काँग्रेस पक्षाच्या या कारवाईवर आचार्य प्रमोद कृष्णम यांची प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. या प्रकरणी आता ते काय प्रतिक्रिया देतात. यानंतर ते भाजपात (BJP) प्रवेश करणार का, हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

Ram Mandir सोहळ्यात गाजला ज्युबिन नौटियाल, ‘मेरे घर राम आये हैं’ ने घेतला भाविकांच्या मनाचा ठाव

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज