PM Modi यांच्याकडून समुद्रतळ गाठत द्वारकेचे दर्शन, स्कुबा डायविंगचा घेतला आनंद; पाहा फोटो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमध्ये द्वारका येथे समुद्राच्या खोल पाण्यामध्ये जात जलमग्न द्वारका नगरीचे दर्शन घेतले.

यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली की, या अनुभवाने मला भारतातील अध्यात्मिक आणि ऐतिहासिक मुळांसोबत असलेला दृढ संबंध अनुभवता आला.

त्यावेळी मोदी यांनी द्वारका नगरीला आदरांजली अर्पण करत भगवान श्रीकृष्णांना मोरपंख अर्पण केले.

त्या अगोदर पंतप्रधान मोदी यांनी सकाळी द्वारकेतील मंदिरांना भेट दिल्या. पूजा-अर्चना केली. तसेच द्वारका द्वीपला जोडणाऱ्या सुदर्शन सेतू पुलाचे उद्घाटन केलं.
