Lok sabha Election : नितीन गडकरींविरोधात विकास ठाकरे, काँग्रेसची दुसरी यादी जाहीर

  • Written By: Published:
Lok sabha Election : नितीन गडकरींविरोधात विकास ठाकरे, काँग्रेसची दुसरी यादी जाहीर

Loksabha Election : लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) काँग्रेसने (congress) राज्यातील दुसरी यादी जाहीर केली आहे. नागपूरमधून विकास ठाकरे, रामटेकला रश्मी बर्वे, गडचिरोलीमधून नामदेव किरसान, तर भंडारा-गोंदिया मतदारसंघातून प्रशांत पडोळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे नितीन गडकरीविरुद्ध (Nitin Gadkari) विकास ठाकरे अशी लढत होणार आहे.


Lok sabha Election : सांगलीत विशाल पाटीलच लढत देतील; काँग्रेस ठाकरेंची मनधरणी करणार!

आतापर्यंत काँग्रेसने राज्यातील अकरा जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. पहिल्या यादीत सात उमेदवारांचा समावेश होता. दुसऱ्या यादीत चार जागांचा समावेश असून, चारही जागा विदर्भातील आहेत. या जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान होत आहे.


कोण आहेत विकास ठाकरे?

विकास ठाकरे हे पश्चिन नागपूरमधील काँग्रेसचे आमदार आहेत. तसेच ते नागपूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. ते लोकसभा निवडणूक लढण्यास इच्छुक नव्हते. तसे त्यांनी पक्षश्रेष्ठींना कळविले होते. परंतु अखेर पक्षाने त्यांच्याशी चर्चा करून त्यांना उमेदवारी जाहीर केली आहे.


अभिनंदन बाबा! तिकीटासाठी एकदाही दिल्लीला न जाता…; संभाजीराजेंची शाहू महाराजांसाठी भावनिक पोस्ट

नाना पटोले राज्यातच
भंडारा-गोंदिया मतदारसंघातून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा होती. परंतु त्यांना लोकसभा लढविण्याची इच्छा नव्हते. त्यामुळे त्यांना उमेदवारी न देता प्रशांत पडोळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.

महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढा, इकडे काँग्रेसचे उमेदवार जाहीर

महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. परंतु काँग्रेसने आपले प्राबल्य असलेल्या व आपल्या वाट्याला येणाऱ्या जागी उमेदवार जाहीर केलेले आहेत. परंतु उद्धव ठाकरे गटाची व शरद पवार गटाची यादी अद्याप जाहीर झालेली नाही. शरद पवार गटाच्या नऊ जागांवर संभाव्य यादी आलेली आहे. परंतु अंतिम यादी अद्याप जाहीर झालेली आहे. काँग्रेसने आतापर्यंत अकरा जागा जाहीर केलेल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज