काँग्रेसचं ठरलं! पुण्यातून रविंद्र धंगेकर तर सोलापुरात प्रणिती शिंदेंना उमेदवारी…

WhatsApp Image 2024 03 20 At 10.33.06 PM

Congress Candiate List : देशात आगामी लोकसभा निवडणूका (Loksabha Election) जाहीर झाल्यानंतर आता सर्वच पक्षांकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. अशातच आता काँग्रेस राज्यात 18 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं समोर आलं आहे. आज काँग्रेसच्या नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत 18 उमेदवारांच्या नावावर चर्चा झाली असून सोलापूरमधून प्रणिती शिंदे (Praniti Shinde) तर पुण्यातून रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना उमेदवारी देण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांकडून देण्यात आली आहे.

Bhumi Pednekar : एक महिला सीरीज लीड करू शकते याचं आश्चर्य वाटत; दलदलनिमित्त भूमीने व्यक्त केल्या भावना

काँग्रेसकडून कोणाला उमेदवारी?

चंद्रपूर – विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार
अमरावती – आ.बळवंत वानखेडे
नागपूर – आ.विकास ठाकरे
सोलापूर – आ. प्रणिती शिंदे
कोल्हापूर – शाहू छत्रपती
पुणे – आ.रवींद्र धंगेकर
नंदुरबार – गोवाशा पाडवी (के. सी पाडवी यांचा मुलगा)
नागपूर – आ.विकास ठाकरे
गोंदिया- भंडारा – प्रदेशाध्यक्ष आ. नाना पटोले
गडचिरोली – नामदेव किरसान
अकोला – अभय पाटील
नांदेड – वसंतराव चव्हाण
लातूर – डॉ. कलगे

Government Schemes : राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत प्लास्टिक मल्चिंग अनुदान योजना

मागील काही दिवसांपासून काँग्रेसच्या नेत्यांच्या जागावाटपाबाबत अनेक बैठका घेतल्या जात होत्या. उद्या मुंबईत महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक पार पडणार आहे. या बैठकीत महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून जागावाटपाचा पेच सुटणार असल्याची शक्यता आहे. याबाबत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार म्हणाले, आता फार काही वाद राहिलेला नाही. दोन किंवा तीन जागांच्या संदर्भात चर्चा सुरु आहे. त्याबाबत अंतिम निर्णय बाकी आहे.

follow us