Loksabha Election : ठरलं! मनसेला मिळणार ‘हा’ मतदारसंघ, महायुतीच्या बैठकीत एकमत
Loksabha Election 2024 : काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना महायुतीसोबत जाणार अशी चर्चा रंगली होती. अशातच आता दक्षिण मुंबई लोकसभेची (South Mumbai Lok Sabha) जागा मनसेला मिळण्याची शक्यता आहे. महायुतीच्या बैठकीत यावर एकमत झालं आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान बांगलादेशसाठी आनंदाची बातमी, ‘या’ खेळाडूचं पुनरागमन
गेल्या अनेक दिवसांपासून महायुतीतील जागावाटपावर चर्चा सुरू आहे. मात्र, अद्याप महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत आज दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत जागावाटपाचा मुद्दा मार्गी लागण्याची शक्यता आहे. पण, त्याधीच महायुतीच्या बैठकीत दक्षिण मुंबईची जागा मनसेला देण्यावर एकमत झाले आहे. मात्र, मनसे कोणत्या चिन्हावर निवडणूक लढवणार याचा निर्णय अद्याप झालेला नाही. मनसे ही जागा कोणत्या चिन्हावर लढवणार हे आज दिल्लीत निश्चित होणार आहे.
मनसे अजूनही रेल्वे इंजिनवर लोकसभा निवडणूक लढविण्यावर ठाम आहे. मात्र, धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव महायुतीकडून मनसेला देण्यात आला आहे. राज ठाकरे यांनी हा प्रस्ताव मान्य केला की नाही हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाची जागा मनसेला देण्याबाबत एकमत झाल्याची माहिती आहे.
दक्षिम मुंबई हा मतदार संघ सध्या ठाकरे गटाकडे आहे. भाजप नेते आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही दक्षिण मुंबईतून तयारी केली होती. मात्र आता ही जागा मनसेला मिळण्याची शक्यता आहे. मनसे नेते बाळा नांदगावकर यांना येथून उमेदवारी दिली जाऊ शकते. बाळा नांदगावकर हे दक्षिण मुंबईचे माजी आमदार आहेत. त्यांनी शिवसेनेच्या दगडू सकपाळ यांचा पराभव करून ऐतिहासिक विजय मिळवला होता.
कोणाला किती जागा?
भाजपने महाराष्ट्रातील 20 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचेही नाव आहे. भाजपने काही उमेदवारांची नावे जाहीर केली असली तरी महायुतीच्या उमेदवारांची संपूर्ण यादी अद्याप जाहीर झाली नाही. मात्र प्राथमिक माहितीनुसार भाजपला 20, शिंदे यांच्या शिवसेनेला 13, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 6 आणि मनसेला एक जागा मिळण्याची शक्यता आहे.