श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान बांगलादेशसाठी आनंदाची बातमी, ‘या’ खेळाडूचं पुनरागमन

श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेदरम्यान बांगलादेशसाठी आनंदाची बातमी, ‘या’ खेळाडूचं पुनरागमन

BAN vs SL : बांगलादेश (Bangladesh)आणि श्रीलंका (Sri Lanka)यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सुरुवात झाली आहे. दोन्ही संघांमधील मालिकेतील पहिला सामना सिलहट आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर (Sylhet International Cricket Stadium)खेळवला जात आहे. या सामन्यादरम्यान बांगलादेशसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. दरम्यान संघाचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन (Shakib Al Hasan)दुसऱ्या कसोटीतून संघात पुनरागमन करु शकतो.

Loksabha Election : निलेश लंके शरद पवार गटाच्या मेळाव्याला आले पण गुपचूप पळाले !

शाकिब अल हसनच्या बोटाला दुखापत अन् डोळ्याच्या समस्येमुळे तो बराच काळ टीमपासून बाजूला होता. बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या म्हणण्यानुसार, शाकिब अल हसन श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पुनरागमन करेल, जो 30 मार्चपासून चितगाव येथे सुरू होणार आहे. शाकिब अखेरचा बांगलादेशकडून 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात खेळताना दिसला होता.

विद्यार्थ्यांचं आयडी जप्त करून सभेला हजर राहण्याची सक्ती, ठाकरे गटाची भाजपवर कडाडून टीका

या स्पर्धेदरम्यानच तो जखमी झाला. त्यानंतर तो न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेत सहभागी होऊ शकला नाही. शाकिब अल हसन संघाबाहेर गेल्यानंतर नझमुल हुसेन शांतोला बांगलादेशच्या क्रिकेट संघाचा नवा कर्णधार बनवले.

शाकिब अल हसनबद्दल बोलताना बांगलादेश क्रिकेट बोर्डाने सांगितले की, आम्हाला आशा आहे की तो श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी परतेल. त्याला खेळायचे आहे. आमच्या मते, त्याच्याकडे अजूनही सामन्याच्या तयारीसाठी पूर्ण वेळ आहे. शाकिबचे बांगलादेश संघात पुनरागमन झाले तर त्याचा पुरेपूर फायदा संघाला मिळू शकतो.

आंतरराष्ट्रीय स्तरावर पुनरागमन करण्याच्या तयारीसाठी त्याला बॅटबरोबर आणखी वेळ देण्यासाठी शाकिबने अलीकडेच ढाका प्रीमियर लीग, देशाच्या पारंपारिक लिस्ट ए टूर्नामेंटमध्ये खेळण्यासाठी शेख जमाल धनमंडी क्लबमध्ये प्रवेश केला. सध्याची मालिका आयसीसी कसोटी चॅम्पियनशिपच्या तिसऱ्या चक्राचा भाग आहे. त्यामुळे आता बांगलादेश टीमचा अनुभवी अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनने दुसऱ्या कसोटीतून संघात पुनरागमन केल्यास केल्यास ही त्या टीमसाठी मोठी आनंदाची बातमी असणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube

वेब स्टोरीज