Video : Shakib Al Hasan राजकीय पिचवरही हिट ! पण चाहत्याला मारहाण केल्याने प्रचंड ट्रोल !

  • Written By: Published:
Video : Shakib Al Hasan राजकीय पिचवरही हिट ! पण चाहत्याला मारहाण केल्याने प्रचंड ट्रोल !

Shakib Al Hasan: बांगलादेश क्रिकेट संघाचा कर्णधार राहिलेला शाकिब अल हसन (Shakib Al Hasan) हा लोकसभा निवडणुकीत ( Bangladesh Elections 2024) तब्बल दीड लाख मतांनी विजयी झाला आहे. पहिल्यांदाच तो खासदार झाला आहे. राजकीय व क्रिकेट अशा दोन्ही जबाबदाऱ्या तो पार पाडणार आहे.

पवारसाहेब रोहितच्या वयाचे असताना मुख्यमंत्री झाले होते, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना खोचक टोला

शाकिब अल हसनने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये बांगलादेशचे कर्णधारपद भूषविले आहे.शाकिब हा मगुरा येथील पश्चिम शहर या लोकसभा जागेवरून मोठ्या फरकाने निवडून आला आहे. या विजयावर कर्णधार शाकिब अल हसन याने अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. शाकीब हसन सध्या बांगलादेश क्रिकेट संघाबरोबर नाही. या निवडणुकीसाठी तो न्यूझीलँड दौरावर गेलेला नव्हता.

शकीब अल हसनला 2023 च्या वर्ल्डकपसाठी संघाचा कर्णधार करण्यात आले होते. परंतु बांगलादेश संघाचे प्रदर्शन चांगले झाले नाही. तोही खास काही करू शकला नाही. त्यामुळे हसन हा क्रिकेटमधून निवृत्त होईल, असे बोलले जात होते. परंतु त्याने निवृत्ती जाहीर केलेली नाही. आता त्याने राजकारणात प्रवेश केला आहे. परंतु तो क्रिकेट खेळतच राहणार आहे.

अजितदादा भाजप अन् शिंदेंना स्वस्थ बसू देणार नाही; जितेंद्र आव्हाडांचा दावा

शाकिब हल हसन याने पंतप्रधान यांच्या अवमी लिगकडून निवडणूक लढविली. शेख हसिना या पुन्हा पंतप्रधान होणार असून, त्या गोपालगंज जागेवरून आठव्यांदा निवडून आल्या आहेत. त्यांच्या पक्षाने तीनशेपैकी तब्बल 223 जागा जिंकल्या आहेत.

शाकिब अल हसन भडकला ! चाहत्याला मारहाण

रविवारी मतदानाच्या दिवशी शाकिब हसन हा एका मतदान केंद्रावर आला होता. त्यावेळी त्याचे चाहते हे जल्लोष करत होते. त्यात त्याच्या एका चाहत्याने त्याच्याबरोबर सेल्फी घेण्याचा प्रयत्न केला. तो शाकिब यांचा हात धरत होता त्यावेळी चिडलेल्या शाकिबने त्या चाहत्याला चेहऱ्यावर फटका मारला. या मारहाणीचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. त्याच्या या वागण्यावरून तो आता ट्रोल झाला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज