पवारसाहेब रोहितच्या वयाचे असताना मुख्यमंत्री झाले होते, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना खोचक टोला

पवारसाहेब रोहितच्या वयाचे असताना मुख्यमंत्री झाले होते, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना खोचक टोला

Supriya Sule On Ajit Pawar : वयाच्या 84 व्या वर्षीदेखील माणूस एवढ्या जिद्दीने लढतोय, हा सर्वांसाठी मोठा आदर्श असला पाहिजे. या वयामध्ये देखील ते एकदम कुल आहेत. त्यामुळे अजितदादांची अडचण कशाला असायला पाहिजे? असा खोचक सवाल खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule)यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar)यांना विचारला आहे. पवारसाहेब हे रोहितच्या वयाचे असताना मुख्यमंत्री झाले होते, असं म्हणत सुप्रिया सुळेंनी थेट अजित पवारांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केला आहे. त्या पुण्यात (Pune)पत्रकारपरिषदेमध्ये बोलत होत्या.

मोहोळ कुटुंब हिंदुत्वासाठी झटणारं; स्वाती मोहोळ यांच्या भेटीपूर्वी नितेश राणेंचं मोठं विधान

यावेळी पत्रकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या वयाचा उल्लेख केला जात असल्याचा प्रश्न उपस्थित केला. त्यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी अजितदादांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली. त्या म्हणाल्या की, ते 84 वर्षांचे असूनही ते अजून खूप कुल आहेत.

…म्हणूनच मी संजय राऊतांचं पूर्ण नाव घेतो; नितेश राणेंनी सांगितलं कारण…

ते इतकं वय असूनही मोठ्या जिद्दीनं लढत आहेत. त्यांचा आपल्याला आदर्श असला पाहिजे. त्यावर पत्रकारांनी, हीच अडचण अजितदादांना आहे का? असा प्रश्न विचारला, त्यावर सुप्रिया सुळे यांनी सांगितलं की, अडचण कशाची? त्याची अडचण कशी होऊ शकते?

अडचण कधी होते, जेव्हा दोघांनाही एकच गोष्ट हवी असते, या दोघांना म्हणजेच अजितदादा आणि शरद पवार यांना कोणती अशी गोष्ट आहे का जी त्यांना पाहिजे? असा प्रश्न उपस्थित केला.

शरद पवार यांचा करिअर ग्राफ पाहा, त्यांच्या राजकीय कारकिर्दीबद्दल बोलायला मी तर खूप लहान आहे. अजितदादांचे कोणकोणते हट्ट हे शरद पवारांनी पुरवले आहेत? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला, त्यावर सुळे म्हणाल्या की, हे मी कशाला सांगू ते उभ्या महाराष्ट्राने पाहिले आहेत. तुम्ही त्यांनाच विचारा मी त्याच्यावर कसं बोलणार, असंही खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

अजितदादांनी आमदार रोहित पवार यांनी बच्चा म्हटलं त्यावरुनही पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केला, त्यावर खासदार सुळे यांनी सांगितले की, रोहित हे अजितदादांसाठी बच्चा आहेत. कारण ते सिनिअर सिटीझन आहेत. त्यांचं वय हे 65 वर्षांपेक्षा जास्त आहे. त्यामुळं काकाच्या नात्यानं अजितदादा रोहितला बच्चा म्हटले असतील, असेही यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube