बांग्लादेशमध्ये पुन्हा हाहा:कार! हवाई दलाच्या तळावर हल्ला, गोळीबार, अन् मृत्यूतांडव

Major attack on air force base in Bangladesh : बांग्लादेश (Bangladesh) हवाई दलाच्या हवाई तळावर जमावाने हल्ला केलाय. हवाई दलाच्या कर्मचाऱ्यांना तातडीने परिस्थिती (air force base) हाताळावी लागली. सोमवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास हा हल्ला झाला. हवाई दलाच्या जवानांनी अनेक राउंड गोळीबार (Bangladesh News) केला. या हल्ल्यात एका 25 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.
..आम्ही खोलात गेलो, तर मुश्किल होईल; नीलम गोऱ्हेंवर राऊतांनी केलेल्या पलटवारावर शिरसाठांचा वार
बांगलादेशमधील हवाई दलाच्या तळावर मोठा हल्ला करण्यात आलाय. हे ठिकाण एअरबेस कॉक्स बाजार येथे आहे. बांग्लादेश हवाई दलाचे कर्मचारी या कारवाईत गुंतले आहेत. अनेक लोक जखमी झाल्याचं वृत्त समोर आलंय. बांग्लादेश सशस्त्र दलाच्या मीडिया विंग इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स (ISPR) ने दिलेल्या माहितीप्रमाणे, कॉक्स बाजारमधील हवाई दलाच्या तळाशेजारी असलेल्या समिती पारा येथील काही बदमाशांनी हा हल्ला केला. बांग्लादेश हवाई दल आवश्यक कारवाई करत आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी साडेअकरा वाजता हवाई दलाच्या जवानांनी निदर्शकांवर गोळीबार केला.
एका स्थानिक पत्रकाराच्या म्हणण्यानुसार, उपायुक्तांनी समिती पाराच्या लोकांना हवाई दलाचा परिसर सोडून खुरुष्कुल गृहनिर्माण प्रकल्पात जाण्याचे आदेश दिले होते. यानंतर एका गटाने एअरबेसवर हल्ला केला.
Sonalee Kulkarni :नाद खुळा! पिवळ्या रंगाच्या साडीत सोनालीचं बीचवर झक्कास फोटोशूट
मृत तरुणाचे नाव शिहाब कबीर नाहीद असे असून 25 वर्षीय आहे. तो समिती पारा येथील रहिवासी होता. कॉक्स बाजार रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी साबुकतिगीन महमूद शोहेल यांनी सांगितलं की, तरुणाला मृतावस्थेत रुग्णालयात आणण्यात आले. त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला गंभीर दुखापत झाली होती. परंतु मृत्यूचे खरं कारण शवविच्छेदनानंतरच स्पष्ट होईल, असं सांगितलं जातंय.
मागील वर्षी 5 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांच्या हिंसक निदर्शनांनंतर शेख हसीना यांना देश सोडावा लागला होता. तीन दिवसांनंतर 8 ऑगस्ट रोजी मोहम्मद युनूस यांनी बांग्लादेशचा कार्यभार स्वीकारला. पण त्यांच्या राजवटीत बांगलादेश हिंसाचाराच्या विळख्यात सापडला आहे. प्रथम, देशातील 48 जिल्ह्यांमध्ये हिंदूंवर सुनियोजित हल्ले करण्यात आले. यानंतर महिला आणि मुलांवरील लैंगिक हिंसाचाराच्या घटना वाढल्या. आता एअरबेसवरील हल्ल्याचे प्रकरण समोर आलंय.