..आम्ही खोलात गेलो, तर मुश्किल होईल; नीलम गोऱ्हेंवर राऊतांनी केलेल्या पलटवारावर शिरसाठांचा वार

Sanjay Shirsath on Shiv Sena Thackeray Group : विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वादळ उठलं आहे. त्यावर शिवसेना ठाकरे गटातून तुफान पलटवारर झाल्यानंतर (Shirsath) आता शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ मैदानात उतरले आहेत. त्यांनीही तुम्ही कुणाकडून आणि किती पैशे घेता असा थेट घणाघात केलाय.
शिरसाठ म्हणाले, माझ्या जिल्ह्यापुरतं सांगतो. माझ्या विरोधात उमेदवार दिला. पक्षाचा एक निष्ठ असलेला कार्यकर्ता आठ दिवसांचा. आठ दिवसाच्या माणसाला तुम्ही तिकीट देता. मग तमुचे शिवसैनिक कुठं गेले होत, जे 20-25 वर्षांपासून तुमच्यासोबत काम करतायत. त्यांना तिकीट का नाकारलं? आज विचारा त्यांना तो माणसू कुठे आहे. वैजापूरमध्ये बोरनारांच्या विरोधात माणूस दिला होता. व्यापारी माणूस निवडणूक लढवली तो आता भाजपात का गेला असाही प्रश्न शिरसाठांनी विचारला?
अतिशय निर्लज्ज बाई नमकहराम! संजय राऊतांचा पारा चढला, नीलम गोऱ्हेंवर संताप
सिल्लोडचा उमेदवार जो भाजपत होता. निवडणुकीच्या काळात तुमच्याकडे आला, निवडणूक झाली, तो भाजपात का गेला? पैठणचा उमेदवार तो कुठे आहे? विचारा त्यांना अशी टीका मंत्री आणि आमदार संजय शिरसाट यांनी केली. ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्यावर पद मिळतं असा आरोप नीलम गोऱ्हे यांनी केला. त्यावरुन सुरु असलेल्या राजकारणावर संजय शिरसाट यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचा पाडाच वाचला.
मराठवाड्यात अनेक ठिकाणी पैसे घेतले, तिकीटं वाटली, त्याचा परिणाम असा झाला की, जे शिवसैनिक अहो-रात्र काम करतात, ते बाजूला पडले. यात दलालांनी उखळ पाढंर करुन घेतलं. म्हणून कोणी काय केलय त्यापेक्षा तुम्ही काय करताय त्याचं एकदा स्पष्टीकरण द्या असा थेट आसूडच शिरसाठांनी मारलाय. एकनाथ शिंदे बोलतील, त्या दिवशी तुम्हाला कळेल कसे आणि कुठे-कुठे पैसे घेतलेत. या सगळ्यावर बाजू मांडताना आम्हाला सुद्धा त्रास होतो. आम्ही अभिमानाने आणि गर्वाने सांगतो की, शिवसेनाप्रमुख निवडणूक लढवताना विचाराचये बाळा तुझ्याकडे पसे आहेत का, काही मदत लागेल का? मात्र, आता तिकीटासाठी पक्षाला किती पैसे देणार? म्हणून विचारणारे तयार झालेत असा टोलाही त्यांनी लगावला.
… तर मुश्किल होईल
गडाख त्यांच्या मंत्रिमंडळात तीन-चार मंत्री झाले, त्यांना विचारा. त्यांच्या वाढदिवसाला हे जायचे. आम्ही 40 वर्ष काम केलं, पण आम्हाला वाढदिवसाला साधा फोन नाही आणि यांच्या वाढदिवसाला चार्टड घेऊन जायचे असा आरोप संजय शिरसाट यांनी केला. त्या बाईच्या घरावर काही महिला पाठवून मर्दानगी दाखवता का? तुम्ही स्वत:ला मर्द समजता का?. एक महिला काय बोलली, तिच्यावर तुटून पडता. आम्हाला बोलायला लावू नका. आम्ही खोलात गेलो, तर मुश्किल होईल असा इशाराही संजय शिरसाट यांनी दिला आहे.
कोण असत तोडबाजीला?
कॉर्पोरेशनचे व्यवहार कसे होतात? कुठल्या हॉटेलमध्ये होतात, कोण-कोण असत तोडबाजीला? या सगळ्या गोष्टी सर्वांना माहितीये. आरोप करायला काही लागत नाही. जे सत्य आहे, ते सर्वांना मान्य करावं लागेल. आजच्या घडीला जे काय चाललय, त्यामुळे तुमचा पक्ष रसातळाला गेलाय. काल आलेला माणूस नेता होऊ शकतो, त्याला तिकीट मिळतं. पण जो शिवसैनिक तुमच्यासोबत आहे त्याला तुम्ही तिकीट देऊ शकत नाहीत अशी खंत संजय शिरसाट यांनी व्यक्त केली.