Sanjay Shirsath : जे संपलेत त्यांच्यावर बोलून काय होणार; पालकमंत्री शिरसाटांचा खैरे, दानवेंना टोला

Sanjay Shirsath : जे संपलेत त्यांच्यावर बोलून काय होणार; पालकमंत्री शिरसाटांचा खैरे, दानवेंना टोला

Sanjay Shirsath : जे नेते संपलेले आहेत, त्यांच्यावर बोलून काय होणार आहे, आपल्याला आपल्या कामातून पुढे जायचं असल्याचा टोला पालकमंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsath) यांनी लगावलायं. संजय शिरसाट यांची पालकमंत्रिपदी नियुक्ती झाल्यानंतर आज कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्कार सोहळा आयोजित केला होता. यावेळी मंत्री शिरसाट बोलत होते.

हिंदू गर्जना चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन; पुनीत बालन यांच्या हस्ते लोगोचे झालं अनावरण

पुढे बोलताना मंत्री शिरसाट म्हणाले, छत्रपती संभाजीनगरमधील बांग्लादेशी लोकांचा घरोघरी सर्व्हे करणार असून त्यांना कायद्याचा बडगा दाखवणार आहे. तसेच जिल्ह्यातले बटन आणि मटनवाल्या लोकांचाही बंदोबस्त करणार असून ड्रग्ज प्रकरणी हप्तेखोर लोकंच बोलतात, हफ्ता वाढवून दिला की शांत बसतात. हेच लोकं ड्रग्जमाफियांना ताकद देतात. आणि ड्रग्ज घेणारे आमच्या मुलींवर वाईट नजर ठेवतात पण मी ड्रग्जमाफियांचं हे लोन संभाजीनगरमध्ये चालू देणार नसल्याचा इशाराच संजय शिरसाट यांनी दिलायं.

आता खैरे, दानवेंवर टीका करुन काय होणार…
ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे आणि अंबादास दानवे यांच्यावर टीका करुन काय होणार आहे. हे लोकं शहरासाठी काय देत आहेत हे महत्वाचं आहे. जिल्ह्यासाठी तुम्ही काय करता हे जनता पाहत असते. आपला जिल्हा पुढे गेला पाहिजे, जे संपलेले आहेत त्यांच्यावर बोलण्यापेक्षा आपल्याला कामातून पुढे निघून जायचं असल्याचा टोला संजय शिरसाट यांनी विरोधकांना लगावलायं.

एक रुपयात पीक विमा योजना बंद होणार?, गैरव्यवहार झाल्याचं उघड; सरकार मोठा निर्यण घेणार

संजय शिरसाट कोणाच्या बापाला घाबरत नाही…
काही नेत्यांना स्वप्न पडत आहेत, त्यांची मला कीव येते. देवाने जे दिलं होतं ते साभांळता आलं नाही. आता दुसऱ्याला संधी तर द्या. माझ्या बंगल्याचे ड्रोनने फोटो घेत आहेत, बंगला काय खिशात घालण्याची लपवण्याची गोष्ट आहे का? जे आहे ते उघड करा, संजय शिरसाट कोणाच्या बापाला घाबरत नाही जो करेगा खुलके करेगा, असंही संजय शिरसाट म्हणाले आहेत.

दरम्यान, शहरातले मुळातले गुंड समाजसेवक म्हणून वावरत आहेत, त्यांनाही मी बदलून टाकणार असून शहरातल्या चांगल्या लोकांना सोबत घेऊन कारभार करणार आहे. आपल्याकडे दुरदृष्टी आहे. आता पाच वर्षानंतर निवडणूका होणार आहेत. मधल्या काळात जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुका येणार आहेत. या निवडणुकीमध्ये मोठ्या ताकदीने उभे रहा, जिल्हा परिषद आणि महापालिका आपलीच असली पाहिजे, आता ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे त्यासाठी आम्ही आहोरात्र काम करुन, तुम्हाला निवडून आणणं हा आमचं कर्तव्य असल्याचंही शिरसाट म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube