IND VS Bangladesh : पहिल्याच दिवशी अश्विनची बॅट तळपली; शतकी खेळीचा टप्पा गाठला

चेन्नईत भारत विरुद्ध बांगलादेश पहिला कसोटी सामना खेळवला जात असून पहिल्याच सामन्यात आर. अश्विनने शतकी खेळी करत मोठे विक्रम केले आहेत.

R Ashwin

IND VS Bangladesh : भारत विरुद्ध बांगलादेश (IND VS Bangladesh) संघात कसोटी मालिकेचा पहिला चेन्नईमध्ये खेळवला जात आहे. भारताकडून आर अश्विनने बांगलादेशविरुद्ध पहिल्या कसोटीत घरच्या मैदानाच शतकी खेळी करत मोठे विक्रम केले आहेत. कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी आर. अश्विनची बॅट चांगलीच तळपलीयं.

पहिल्या कसोटी सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बांगलादेशच्या गोलंदाजांनी चांगली सुरवात केली. बांगलादेशचा गोलंदाज हसन मेहमुदने आपली शानदार गोलंदाजी करीत भारतीय संघाला सुरवातीला चांगलच नमवलं होतं.

दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा, विजय शिवतारेंशी खास कनेक्शन

हसन मेहमुदच्या गोलंदाजीवर रोहित शर्मा 6, विराट कोहली 6, शुभमन गिल 0, ऋषभ पंत 39, अशा स्टार फलंदाजांना तंबूत पाठवलं. तर के. एल. राहुलही 16 धावा करुन तंबूत परतला. यासोबतच यशस्वी जैस्वालने आपली 56 धावांची खेळी केलीयं. त्यामुळे भारताच्या 6 विकेट्सवर 144 धावा होत्या.

follow us