दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा, विजय शिवतारेंशी खास कनेक्शन

  • Written By: Published:
दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा, विजय शिवतारेंशी खास कनेक्शन

Shivdeep Lande : बिहार पोलीसमधील (Bihar Police) सुपरकॉप अशी ओळख असलेले IPS आयपीएस अधिकारी शिवदीप लांडे (Shivdeep Lande) यांनी भारतीय पोलिस सेवेतील नोकरीचा राजीनामा दिला. लाडे हे आमदार विजय शिवतार (Vijay Shivtare) यांचे जावई आहेत. त्यांनी अचानक दिलेल्या राजीनाम्याची बिहार आणि महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात चर्चा सुरू झाली आहे. राजीनाम्यानंतर देखील बिहारमध्ये सेवा करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Tamannaah Bhatia : ‘मिलान फॅशन वीक’मध्ये तमन्ना भाटियाच्या अनोख्या अदा 

शिवदीप लांडे यांच्या व्हेरिफाईड सोशल मीडिया अकाउंटवरून ही घोषणा करण्यात आल्यानं पोलीस दलातही खळबळ उडाली. त्यांनी दोनच आठवड्यांपूर्वीच पूर्णिया आयजी पदाचा पदभार स्वीकारला होता. त्यानंतर लगेचच त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. तिरहुतसारख्या मोठ्या भागातून पूर्णियाला पाठवण्यात आल्याने ते नाराज होते, अशी चर्चा होती.

बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीपेक्षा मविआत यावं, जयंत पाटील यांची खुली ऑफर… 

आयजी कार्यालयात पत्रकारांशी बोलताना लांडे म्हणाले की, राजीनाम्याची बातमी खरी आहे. मी वैयक्तिक कारणांमुळे भारतीय पोलीस सेवेचा राजीनामा दिला आहे.

सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्यांनी आपण बिहारमध्येच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. गेली 18 वर्षे सरकारी पदावर काम केल्यानंतर आज मी या पदाचा राजीनामा दिला आहे. एवढ्या वर्षात मी माझ्या आणि माझ्या कुटुंबापेक्षा बिहारला जास्त मानलं. माझ्या सेवेत काही चूक झाली असल्यास क्षमस्व. मी यापुढे बिहारमध्येच राहणार आहे. बिहारचं माझी कर्मभूमी असेल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

कुणाचा दबाब होता का?
दरम्यान, शिवदीप लांडे हे अकोल्याचे सुपुत्र आहेत. त्यांनी तिरुहत विभाग ((मुझफ्फरपूर) कोसी विभागाचे उपमहानिरीक्षक आणि बिहारमधील अररिया, पूर्णिया आणि मुंगेर जिल्ह्यांमध्ये पोलीस अधीक्षक म्हणून काम केले आहे. आता त्यांनी राजीनामा दिल्यानं त्यांच्यावर कुणाचा दबाब होता का? अशी चर्चा सुरू झाली.

बिहारमधील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपैकी गेल्या काही दिवसात राजीनामा देणार लांडे हे दुसरे अधिकारी ठरलेत. काहीच दिवसांपूर्वी लेडी सिंघम म्हणून प्रसिद्ध असलेल्या आयपीएस अधिकारी काम्या मिश्रा यांनी वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला होता. आणि आता शिवदीप लांडे यांनी राजीनामा दिल्यानं ते पुढे काय करणार, याची उत्सुकता लागली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube