विजय शिवतारे नाही नाही म्हणाले….. पण ‘शिवदीप’ राजकारणाच्या दिशेने निघाले

विजय शिवतारे नाही नाही म्हणाले….. पण ‘शिवदीप’ राजकारणाच्या दिशेने निघाले

Vijay Shivtare Son In Law Shivdeep Lande : शिंदे गटाचे नेते गटाचे नेते विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांच्या जावयाची राजकारणात एन्ट्री होण्याची दाट शक्यता वर्तवली जातेय. भारतीय पोलिस सेवेतील आयपीएस अधिकारी ‘बिहारचा सिंघम’ म्हणून ओळखले जाणारे शिवदीप लांडे (Shivdeep Lande) सध्या चर्चेत आहेत. अलिकडेच राष्ट्रपतींनी त्यांचा राजीनामा स्वीकारला, त्यानंतर त्यांच्या राजकारणातील (Bihar) प्रवेशाबाबतच्या अटकळांना वेग आला आहे.

जनसुराज हा प्रशांत किशोर यांचा पक्ष आहे. नुकताच त्यांनी हा पक्ष स्थापन केलाय. या पक्षातूनच शिवदीप लांडे राजकारणाचा श्रीगणेशा करू शकतात, अशी शक्यता आहे.

सुबोध भावे आणि मानसी नाईक एकत्र दिसणार! ‘सकाळ तर होऊ द्या’ चित्रपटाची घोषणा

सोशल मीडियावर ‘जन सुराज फॉर बिहार’ नावाच्या पेजने दावा केलाय की, शिवदीप लांडे लवकरच जन सुराज पक्षात सामील होऊ शकतात. तथापि, शिवदीप लांडे यांनी अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. माजी आयपीएस शिवदीप लांडे यांचा (Shivdeep Lande News) राजीनामा 13 जानेवारी रोजी स्वीकारण्यात आला. तेव्हापासून ते सोशल मीडियावर सतत नवीन अपडेट्स देत आहेत. कालही त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केलीय. त्यानंतर ते बिहारच्या राजकारणात प्रवेश करणार, अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेल्या आहेत. तर विजय शिवतारे यांनी लांडे राजकारणात येणार नसल्याचं काही दिवसांपूर्वी स्पष्ट केलं होतं. परंतु लांडे यांच्या या पोस्टमुळे लवकरच ते राजकारणात दिसणार असल्याचं बोललं जातंय.

शिवदीप लांडे यांच्या पोस्टमध्ये काय?

माजी आयपीएस शिवदीप लांडे यांनी पोस्ट केलेल्या छायाचित्रात ते नदीकाठी उभे राहून सूर्याला नमस्कार करताना दिसत आहेत. फोटोमध्ये बिहारचा नकाशाही काढल्याचं दिसतंय. शिवदीप लांडे यांनी 10 फेब्रुवारी रोजी या सोशल पोस्टमध्ये लिहिलंय की, मातीच्या ऋणाकडे एक पाऊल…आणि गणवेश नाही, पण धाडस तेच आहे असं कॅप्शन दिलंय. त्यानुळे शिवदीप लवकरच जनसुराज पक्षामध्ये सामील होऊ शकतात, असा अंदाज राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.

खासदारांच्या पगारात घसघशीत वाढ; कंगालीकडे निघालेल्या पाकिस्तानचा ‘अजब’ निर्णय

माजी आयपीएस शिवदीप लांडे यांनी 19 सप्टेंबर 2024 रोजी नोकरीचा राजीनामा दिला होता. राजीनामा देण्यापूर्वी ते पूर्णियामध्ये आयजी म्हणून तैनात होते. राजीनामा देण्याच्या फक्त 13 दिवस आधी, 6 सप्टेंबर रोजी त्यांनी पूर्णिया रेंजच्या आयजी म्हणून पदभार स्वीकारला होता. बराच काळ त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नाही. यानंतर, लांडे राजीनामा मागे घेतील, अशी अटकळ होती, परंतु या वर्षी जानेवारीमध्ये त्यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube