खासदारांच्या पगारात घसघशीत वाढ; कंगालीकडे निघालेल्या पाकिस्तानचा ‘अजब’ निर्णय

खासदारांच्या पगारात घसघशीत वाढ; कंगालीकडे निघालेल्या पाकिस्तानचा ‘अजब’ निर्णय

Pakistan News : पाकिस्तान सध्या गंभीर आर्थिक संकटाचा (Pakistan News) सामना करत आहे. या संकटातच मंगळवारी पाकिस्तानी राज्यकर्त्यांनी घेतलेल्या एका निर्णयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पाकिस्तान खासदारांच्या पगारात थोडीथोडकी (Pakistan MP) नाही तर तब्बल 138 टक्के वाढ करण्यात आली आहे. कंगालीच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या पाकिस्तानात खासदार मात्र स्वतःचा पगार वाढवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. या निर्णयानुसार आता देशातील खासदारांचा पगार 2 लाख 18 हजार रुपयांवरून 5 लाख 19 हजार पाकिस्तानी रुपये करण्यात आला आहे. भारतीय चलनात ही रक्कम 1 लाख 62 हजार रुपये इतकी होते.

पीएमएलएन (PML-N) पक्षाच्या खासदार रोमिना खुर्शीद आलम यांनी संसद सदस्य वेतन आणि भत्ता (संशोधन) विधेयक 2025 सादर केले. विधेयकाला मोठ्या बहुमताने मंजूर करण्यात आले. या विधेयकामुळे खासदारांच्या पगारात दुपटीपेक्षाही जास्त वाढ होणार आहे.

वित्त समितीकडून विधेयकाला मंजुरी

26 जानेवारी 2025 या दिवशी नॅशनल असेंब्लीत वित्त समितीने या विधेयकाला मंजुरी दिली होती. देश आर्थिक संकटात असताना आणि सरकारकडून खर्चात कपात केली जात असताना खासदारांचे पगार इतक्या मोठ्या प्रमाणात वाढविण्याचा निर्णय घेणे यावर आश्चर्य व्यक्त होत आहे. या निर्णयावर सत्ताधारी पक्षाला विरोधकांचीही साथ मिळाली. विरोधी पक्षातील एकाही खासदाराने यावर आक्षेप घेतला नाही.

भारताचे बजेट पाकिस्तानपेक्षा तब्बल 11 पटीने जास्त, एका क्लीकवर जाणून दोन्ही देशांमधील फरक

पाकिस्तान मागील काही वर्षांपासून गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत आहे. 2023 मध्ये दिवाळखोर होण्यापासून थोडक्यात बचावला होता. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँकेसह काही देशांचे कर्ज पाकिस्तानने घेतले आहे. कर्जाचे हप्ते भरताना तिजोरी रिकामी होत आहे. या गोष्टीची जाणीव असतानाही खासदारांच्या पगारात वाढ करण्याचा निर्णय वादाला तोंड फोडणारा आहे.

महागाई अन् बेरोजगारी वाढली

भारताची फाळणी झाल्यानंतर पाकिस्तान जगाच्या नकाशावर आला. परंतु, या देशाला त्याचा काहीच फायदा झालेला नाही. आज भारत अतिशय वेगाने प्रगती करत आहेत. परंतु, पाकिस्तानात गरीबी, बेरोजगारी आणि महागाई यांसारख्या समस्या स्थायी झाल्या आहेत. कर्ज परतफेड करण्यासाठी वारंवार कर्ज घ्यावे लागत आहे. बेरोजगारी आणि महागाई सातत्याने वाढत चालली आहे. या समस्यांना प्राधान्य देणे, त्यावर सरकारी निधी खर्च करणे गरजेचे असताना पाकिस्तानी खासदार स्वतःचेच खिसे भरण्यात मश्गुल झाले आहेत. पगारात वाढ करण्याचा हा निर्णय वादात अडकण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

पाकिस्तानची पुन्हा फजिती! तिकीट विक्री सुरू पण मैदानेच अर्धवट; ICC ची डेडलाइन हुकणार?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube