Vijay Shivtare : ‘बारामतीच्या विजयात पुरंदरचा सिंहाचा वाटा असणार’
Vijay Shivatare News : बारामतीच्या विजयात पुरंदरचा सिंहाचा वाटा असणार असल्याची ग्वाही शिवसेना नेते विजय शिवतारे (Vijay Shivatare) यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना दिली आहे. दरम्यान, सासवडमध्ये महायुतीच्या प्रचार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या जाहीर सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, (Eknath Shinde) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) याच्यासह महायुतीचे नेतेमंडळी उपस्थित होते. यावेळी बोलताना विजय शिवतारे बोलत होते.
विजय शिवतारे म्हणाले, येत्या काळात पुरंदर तालुक्यातील जनतेने नरेंद्र मोदी यांना देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज असून आगामी लोकसभा निवडणुकीत बारामतीच्या विजयात पुरंदरचा सिंहाचा वाटा असणार अशी ग्वाही माजी मंत्री शिवतारे यांनी दिली आहे.
अनेक गोष्टी घडत असतात, त्या विसरायच्या असतात. मतभेद झाले तरी हरकत नाही पण मनभेद नको. लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक गावागावात 80 टक्के मतदान सुनेत्रा पवार यांनाच झालं पाहिजे. मुख्यमंत्री, मी तुमचं ऐकलं आहे, माझी काळजी घ्या, तुमचा शब्द ठेवलायं मी. बारामतीच्या विजयाचा सिंहाचा वाटा पुरंदर असणार असल्याचं विजय शिवतारे म्हणाले आहेत.
Viral Video: किली पॉलला पुन्हा एकदा मराठी गाण्याची भुरळ, व्हिडिओ पाहून तुम्ही कराल कौतुक
तसेच 1991 साली सर्वाधिक मताधिक्य पवारांना पुरंदरमधून मिळालं होतं. त्यानंतर आता पुन्हा एकदा आम्ही महायुतीचे पदाधिकारी,कार्यकर्ते बारामतीसह सर्वच तालुक्यात फिरुन सुनेत्रा पवारांसाठी ताकद लावून उतरणार आहोत. निवडणुकीत सुनेत्रा पवार येऊ न येवो मात्र, आम्ही आमचे दौरे करुन लोकांना समजावून सांगणार असल्याचंही विजय शिवतारेंनी सांगितलं आहे.
दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघ कोणाचा सातबारा नाही. आता बदला घेण्याची वेळ आलीय… अजितदादांची गुर्मी जाणार नाही… आता माघार घेणार नाही… अशी एकापेक्षा एक आक्रमक विधान करत विजय शिवतारे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार यांच्याविरोधात शड्डू ठोकला होता. शिवतारेंच्या अपक्ष उमेदवारीच्या घोषणेमुळे येथे तिरंगी लढत होणार असल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यामुळे अजित पवार यांचे टेन्शन वाढले होते.
शिवतारे यांच्या या शड्डूला जुन्या वादाची किनार असली तरीही यंदा बारामतीमध्ये शरद पवार यांना पराभूत करायचे असल्याने हा वाद मिटविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील अशा सगळ्या नेत्यांनी मध्यस्थी केली होती. पण शिवतारे माघार घ्यायला तयार नव्हते. अखेरीस सर्वच नेत्यांनी प्रयत्न करुन शिवतारे यांची मनधरणी केल्यानंतर विजय शिवतारे यांनी माघार घेतली आहे.