नकली शिवसेना, राष्ट्रवादी महाराष्ट्राचे भले करतील का? अमित शाहांचा ठाकरे, पवारांवर हल्लाबोल
amit-shah-address-election-rally-in-nanded-attack-on-sharad-pawar-udhav-thackeray: लोकसभा निवडणुकीसाठी गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी विदर्भानंतर नांदेडमध्ये महायुतीच्या उमेदवारासाठी प्रचार सभा घेतली. या सभेत अमित शाह यांनी उद्धव ठाकरे, शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला आहे. उद्धवसेनेची शिवसेना नकली आहे. तर शरद पवारांची राष्ट्रवादी नकली आहे. त्यांच्याबरोबर अर्धी राहिलेला काँग्रेस (Congress) पक्ष आहे. हे तिघे मिळून महाराष्ट्राचा काय भले करतील, असा सवालही अमित शाह यांनी केला आहे.
शरद पवारांचा वळसे पाटलांना धक्का, निकटवर्तीय करणार अमोल कोल्हेंचा प्रचार
अमित शाह म्हणाले, देशातील सुरक्षेत आणि समृद्धीत आता वाढ होत आहे. आमच्याविरोधात निवडणूक लढण्यासाठी महाराष्ट्रात तीन पक्ष एकत्र आले आहेत. त्यात एक नकली शिवसेना, एक नकली राष्ट्रवादी आणि एक अर्धी राहिलेला काँग्रेस पक्ष आहे. गुजरातमध्ये एक म्हण आहे, तीन तिघाडा आणि काम बिघाडा. उद्ववसेनेची शिवसेना ही अर्धी राहिली आहे. तर शरद पवारांची राष्ट्रवादी अर्धी राहिली आहे. हे दोघे अर्धे होते. या दोघांनी मिळून काँग्रेसला अर्धे केले आहे. तीन अर्धे मिळून महाराष्ट्राचा काय विकास करतील. ही कशी ऑटो रिक्षा आहे. तीन पाय आहेत. पण रिक्षाचे स्पेअर पार्ट हे वेगवेगळ्या गाड्यांचे आहे. निवडणुकीनंतर हे सगळे लोक फुटून जातील. देशाचा विकास पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करतील. महाराष्ट्राचा विकास हा देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हे करतील, असे ही शाह म्हणाले.
त्याचबरोबर अमित शाह यांनी राम मंदिर, कलम 370 वरून काँग्रेसला जोरदार घेरले. तर देशातील पाकिस्तानकडून होत असलेला दहशतवादी हल्ल्यांना भारताने पाकिस्तानध्ये घुसून उत्तर दिले आहे. देशातील नक्षलवादही उखडून टाकल्याचे अमित शाह यांनी सांगितले.
आत्ताचे शाहू महाराज खरे वारसदार नाहीत, ते दत्तकच…; संजय मंडलिकांचा तोल सुटला
शरद पवारांना हिशोब मागा?
शरद पवार हे दहा वर्षे सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये कर्ताधर्ता होते. दहा वर्षात तुम्ही महाराष्ट्रात काय दिले आहे, याचा हिशोब दिला पाहिजे. नांदेडकरांनी हिशोब मागितला पाहिजे. ते हिशोब देणार नाहीत. मी देतो, दहा वर्षांत त्यांनी महाराष्ट्राला 1 लाख ९१ हजार कोटी रुपये दिले आहे. पण नरेंद्र मोदी यांनी दहा वर्षांत 7 लाख 15 हजार कोटी रुपये महाराष्ट्राला दिले आहेत. त्याएवेजी पायाभूत सुविधेसाठी 3 लाख 90 हजार कोटी वेगळे दिले आहे. रस्त्यांच्या विकासासाठी, रेल्वेच्या विकासासाठी, विमानतळासाठी, विशेष कामांसाठी वेगळा निधी दिल्याचे अमित शाह यांनी म्हटले आहे.