नाना पटोलेंचा अपघात की कट? काँग्रेसला शंका, EC ला पत्रच धाडलं

नाना पटोलेंचा अपघात की कट? काँग्रेसला शंका, EC ला पत्रच धाडलं

Nana Patole News : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या कारला मंगळवारी रात्रीच्या सुमारास अपघात झाला. प्रचारसभेवरुन परत येत असतानाच पटोलेंच्या ताफ्यातील कारचा अपगात झाला आहे. या अपघातानंतर राजकीय वर्तुळात अनेक आरोपांचं सत्र सुरु झालं. अशातच आता काँग्रेसला हा अपघात आहे की कट? अशी शंका असल्याने निवडणूक आयोगाला पत्रच धाडत चौकशीही मागणी करण्यात आली आहे.

नाना पटोले यांचा अपघात झाल्यानंतर अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. याबाबत काँग्रेसकडून ट्विट करण्यात आलं आहे. नाना पटोले भंडारा जिल्ह्यातील प्रचार दौऱ्यावर असताना मंगळवारी रात्री कारदा गावाजवळ एका ट्रकने त्यांच्या गाडीला धडक देऊन चिरडण्याचा प्रयत्न केला आहे. ही अत्यंत गंभीर घटना असून नाना पटोले यांचा घातपात करण्याचा डाव होता का ? अशी शंका असून या घटनेची सखोल चौकशी करावी तसेच नाना पटोले यांच्यासह काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची सुरक्षा वाढवावी, अशी मागणी प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पत्राद्वारे निवडणूक आयोगाकडे केली आहे.

आंबेडकरांचा मुंबईसाठीचा ‘माईंड गेम’ अचूक ठरला; आता लक्ष उद्याच्या घोषणेकडे…

नाना पटोलेंच्या अपघातावर फडणवीस काय म्हणाले?
मला वाटत नाही नाना पटोले असं म्हणतील. मी त्यांची विचारपूस केली, त्यांना फोन केला. आम्ही वेगळ्या पक्षात आहोत पण आम्ही एकमेकांचे शत्रू नाहीत. नाना पटोले आमचे मित्र असून आमच्यात वैचारीक सामना सातत्याने चालू असतो. जसं समजलं तसा मी नानांना फोन केला. नानांनी सांगितलं की, मोठा अपघात झाला असून मी थोडक्यात बचावलो आहे. राज्याच्या राजकारणात अशी परिस्थिती न उद्भवली न उद्भभवणार नाही, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज