अमोल कोल्हेंचा विजय सुकर; शिरुरमध्ये शरद पवार गटाची ताकद वाढली!

अमोल कोल्हेंचा विजय सुकर; शिरुरमध्ये शरद पवार गटाची ताकद वाढली!

Atul Deshmukh News : राज्यात लोकसभा निवडणुकीचं वातावरण तापलेलं असतानाच आता शिरुर लोकसभा मतदारसंघात (Shirur Loksabha) मोठी घडामोड घडलीयं. महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांचा विजय सुकर करण्यासाठी शरद पवारांनी (Sharad Pawar) डाव टाकला आहे. खेड तालुक्यातील भाजपचे नेते अतुल देशमुख (Atul deshmukh) यांनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपसह अजितदादा गटाला हा मोठा धक्काच असल्याचं मानलं जात आहे.

राज ठाकरे म्हणजे कर्ण, भूमिका बदलणं जिवंतपणाचं लक्षण; प्रकाश महाजन स्पष्टच बोलले

मागील काही दिवसांपासून अतुल देशमुख भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. सध्या राजकीय गणितं बदलल्याने खेड-आळंदीतील अजितदादा गटाचे आमदार दिलीप मोहित-पाटील यांच्या नेतृत्वात अतुल देशमुखांना काम करावं लागणार होतं. त्यामुळे अतुल देशमुख यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. दिलीप मोहिते पाटलांना विरोध केला त्यांच्यासोबत काम कराव लागणार असल्याने देशमुखांनी भाजपला सोडचिठ्ठीच दिली आहे.

‘त्या’ फ्लॅटवर मी फक्त उपयोगाची वस्तू… बाळाला कडेवर घेत रामदास तडस यांच्यावर सूनेचे गंभीर आरोप

शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेत अतुल देशमुख यांनी हजेरी लावत शरद पवारांचं नेतृत्व स्विकारलं असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, अतुल देशमुख यांनी शरद पवार गटात प्रवेश केला असल्याने आता शिरुर लोकसभेसाठी अमोल कोल्हे यांचा विजय सोपा झाला आहे. अतुल देशमुखांनी प्रवेश करीत दिलीप मोहिते यांच्यासह अजित पवार यांना शह देण्यासाठी शरद पवारांनी ही मोठी खेळी खेळली असल्याचं सांगण्यात येत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube