राज ठाकरे म्हणजे कर्ण, भूमिका बदलणं जिवंतपणाचं लक्षण; प्रकाश महाजन स्पष्टच बोलले
Prakash Mahajan : राज ठाकरे म्हणजे आधुनिक कर्ण, भूमिका बदलणं हे जिवंतपणाचं लक्षण असल्याचं प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या राजकीय भूमिकेवर थेटपणे भाष्य केलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election) राज ठाकरेंनी मोदींना बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे. राज ठाकरेंच्या या भूमिकेनंतर राजकीय वर्तुळात ते टीकेचे धनी होत आहे. अनेक राजकीय नेत्यांकडून त्यांच्यावर सडकून टीका केली जात आहे. विरोधकांच्या टीकेनंतर प्रकाश महाजन यांनी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे यांच्या भूमिकेवर भाष्य केलं आहे.
‘त्या’ फ्लॅटवर मी फक्त उपयोगाची वस्तू… बाळाला कडेवर घेत रामदास तडस यांच्यावर सूनेचे गंभीर आरोप
राज ठाकरे म्हणाले, राज ठाकरेंनी जी भूमिका घेतली ती खूप विचाराअंती घेतली आहे. कार्यकर्त्यांना भूमिका समजायला वेळ लागेल पण निश्चित ते समजतील. विरोधक जे आहेत, त्यांना अपेक्षा होती की राज ठाकरे हा निर्णय घेणार नाहीत, मात्र त्यांचा अपेक्षाभंग झाला म्हणून त्यांनी ट्रोलिंग केलं आहे. तुमच्या दृष्टीने राज ठाकरे एवढे गौण आहेत तर ते कुठेही गेले तर तुम्ही का ट्रोल करत आहात? तुम्हाला राज ठाकरेंचं महत्व माहिती म्हणून तुमच्या पोटात दुखतं असल्यांचं प्रत्युत्तर प्रकाश महाजनांनी विरोधकांना दिलं आहे.
सांगलीसाठी विश्वजीत कदमांचा ‘ICE & Sugar’ गेम; विशाल पाटलांचीही बाजूला बसत खंबीर साथ…
मनसैनिक संभ्रमात नाहीत :
मनसैनिक संभ्रमात नाहीत, भूमिका समजायला वेळ लागेल पण निश्चित ते समजतील. लोकसभेची निवडणूक देशपातळीवर आहे, त्याचा परिणाम जागतिक पातळीवर होतो. हिंदुत्वाच्या प्रश्नावर राज ठाकरेंनी मोदींना पाठिंबा दिलायं. मनसेचं हिंदुत्व हे शरीरावर चिकटलेली त्वचा आहे. राज ठाकरेंनी एखादा निर्णय घेतला तो मला चूकीचा वाटला तर मी विरोधात जायचं ही कोणती भूमिका आहे, असं प्रकाश महाजन म्हणाले आहेत.
राज ठाकरे आधुनिक युगातले कर्ण…
जसं त्या कर्णाला माहित होतं की, भिक्षुकाच्या वेशेत इंद्र आपले कवचकुंडले मागायला आले, त्यांनी हसत हसत आपले कवचकुंडले दिली. कवचकुंडले दिल्यावर कुरुक्षेत्रावर त्याचा मृत्यू होणार आहे हे त्याला माहिती आहे. हिंदुत्वाच्या नावाखाली राज ठाकरे यांना मदत मागितली तर त्यांनी खुल्या मनाने दिली, विरोधकांच्या टीकेचा विचार राज ठाकरेंनी केला नाही, असंही प्रकाश महाजनांनी स्पष्ट केलं आहे.