स्वत:चं हिंदुत्व श्रेष्ठ दाखवण्यासाठी ठाकरे… प्रकाश महाजनांचा आरोप

स्वत:चं हिंदुत्व श्रेष्ठ दाखवण्यासाठी ठाकरे… प्रकाश महाजनांचा आरोप

मुंबई : उद्धव ठाकरे स्वत:चं हिंदुत्व श्रेष्ठ दाखवण्यासाठी महिलांना पुढे करत असल्याचा आरोप मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केला आहे. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीदरम्यान सध्या राज्यात सुरु असलेल्या राजकीय घडामोडींवर महाजन यांनी भाष्य केलंय. यावेळी त्यांनी सत्ताधाऱ्यांनाही सोडलं नाही.

न्यायालयाचा कौल तनपुरेंच्या बाजूने, कर्डिलेंना धक्का; राहुरीतील रस्ते होणार चकाचक

महाजन म्हणाले, उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत महिलेला अर्वाच्च शब्दांत शिव्या देतात. त्याबद्दल उद्धव ठाकरे काहीच बोलत नाहीत. उद्धव ठाकरेंच्याच काळात अभिनेत्री कंगना राणावतला त्रास दिला जातो आणि ठाकरे गप्प बसतात. सोयीच्या राजकारणासाठी स्त्रियांना पुढे केलं जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.

आदित्य ठाकरे ठाण्यातला कोणता मतदारसंघ निवडणार?

जनतेच्या हितासाठी राजकीय नेत्यांनी एकत्र येत काम केलं पाहिजे. सत्तेला जनतेची सेवा करण्याचं साधन सर्वच राजकीय नेत्यांनी समजलं पाहिजे, तसेच राजकीय वाकयुद्ध बंदच झालं पाहिजे, असाही सल्ला त्यांनी यावेळी सर्वच राजकीय नेत्यांना दिला आहे.

…तर नातेवाइकांच्या ठेवी तुम्हाला मिळणार; आरबीआयचा मोठा निर्णय

एकीकडे उद्धव ठाकरे सभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं पूजन करतात आणि बाबासाहेबांचे नातू बाळासाहेब आंबेडकरांचं नाव घेत नाहीत, त्यांच नाव घेणं हे उद्धव ठाकरेंच्या सोयीचं नसल्याचंही ते म्हणाले आहेत.

Khatron Ke Khiladi 13: ‘खतरो के खिलाडी’ च्या या सिझनमध्ये दिसणार हे स्पर्धक

दरम्यान, राज्यात सध्या एक राजकीय नेता बोलला की त्याला दुसरा नेता प्रत्युत्तर देतो, हे राजकारण कुठंतरी थांबायला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube