…तर नातेवाइकांच्या ठेवी तुम्हाला मिळणार; आरबीआयचा मोठा निर्णय

  • Written By: Published:
…तर नातेवाइकांच्या ठेवी तुम्हाला मिळणार; आरबीआयचा मोठा निर्णय

Reserve Bank of India On Unclaim Deposit: देशातील बंकाँकडे ठेवीवर दावा न केलेले हजारो कोटी रुपये पडून आहेत. या रक्कमेवर कोणीही कायदेशीर दावा करत नाही. या ठेवी मिळविण्यासाठी असलेल्या कायदेशीर अडचणी किंवा आपल्या नातेवाइकांनी ठेवलेल्या ठेवीची माहिती नसते. त्यामुळे या ठेवी तशाच बँकांकडे पडून राहतात. ही रक्कम ठेवीदाराच्या नातेवाइकांना मिळविण्यासाठी आरबीआयने आता पावले उचलली आहेत.

मोदीजी, बाते मत बनाइये, भ्रष्टाचार की जाँच करवाइये, जेपीसी जांच बिठाइये!

आरबीआयची आज चलनविषयक धोरणाची बैठक झाली आहे. त्यात गर्व्हनर शक्तिकांत दास यांनी दोन महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. रेपो रेटच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे कर्जदारांच्या इएमआयमध्ये कोणत्याही बदल होणार नाही. तर दुसरा निर्णय हा बँकेत पडून असलेल्या ठेवींबाबत आहे.

Mallikarjun Kharge : ५० लाख कोटींचा अर्थसंकल्प १२ मिनिटांत पास झाला; सरकारवर हल्लाबोल

दावा न केलेल्या ठेवीची व्याख्या आरबीआयची केलेली आहे. त्यानुसार गेल्या दहा वर्षांत कोणत्याही ठेवीदाराकडून आपल्या खात्यात पैसे जमा केलेले नाहीत. त्यातून कोणतीही रक्कम काढली जात नाही. तेव्हा या कालावधीत खात्यात असलेली रक्कम ही दावा न केलेली ठेव मानली जाते. देशातील बँकांकडे हजारो कोटी रुपयांची अशी रक्कम पडून होती. देशातील विविध सरकारी बँकांमध्ये सुमारे 35 हजार कोटी रुपये दावा न केलेल्या ठेवी पडून आहेत. हे पैसे बँकांनी आरबीआयकडे जमा केले आहेत.

याबाबत आरबीआयचे गर्व्हनर शक्तिकांत दास म्हणाले की, या ठेवींचे पैसे हक्क नसलेल्या ठेवींमध्ये जाऊ नयेत यासाठी आम्ही पावले उचलत आहोत. दावा न केलेल्या ठेवी त्यांच्या कायदेशीर मालकांपर्यंत पोहोचवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ठेवीदार किंवा लाभार्थी डेटासाठी सेंट्रल बँकेने आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) टूल्सच्या मदतीने एक वेब पोर्टल तयार केले आहे. याद्वारे वेगवेगळ्या बँकांच्या ठेवीदारांची माहिती, हक्क नसलेल्या ठेवींबाबत योग्य माहिती उपलब्ध करून देण्यात येत आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube