Mallikarjun Kharge : ५० लाख कोटींचा अर्थसंकल्प १२ मिनिटांत पास झाला; सरकारवर हल्लाबोल

  • Written By: Published:
Mallikarjun Kharge : ५० लाख कोटींचा अर्थसंकल्प १२ मिनिटांत पास झाला; सरकारवर हल्लाबोल

केंद्र सरकारने अदानी प्रकरणावरून विरोधकांचा आवाज दाबला आहे. सरकार अदानी मुद्द्यावर जेपीसी स्थापन करण्यास का घाबरते? असा प्रश्न काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज सरकारला विचारला आहे. आज संसदीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी खर्गे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी सरकारवर जोरदार टीका केली.

अर्थसंकल्प चर्चेत येऊ नये यासाठी सरकारने सर्वतोपरी प्रयत्न केले. असा आरोप त्यांनी  केला. अदानी प्रकरणावरून पुन्हा एकदा केंद्र सरकारवर हल्लाबोल करताना खर्गे म्हणाले की अदानी मुद्द्यावरून विरोधकांचा आवाज दाबण्यात आला. सरकार या मुद्द्यावर जेपीसी स्थापन करण्यास का घाबरते? ते पुढे म्हणाले की हा मोदी सरकार लोकशाही बद्दल खूप बोलते, पण जे सांगतात ते पाळत नाही.

Pune Politics : माझ्या मित्राला म्हणत टिंगरेंनी ठेवलं मुळीकांच्या मर्मावर बोट!

१२ मिनिटात अर्थसंकल्प पास झाला

यावेळी ते पुढे म्हणाले की ५० लाख कोटींचा अर्थसंकल्प अवघ्या १२ मिनिटांत पास झाला. विरोधकांना चर्चेत स्वारस्य नाही. असे सत्ताधारी सांगत होते पण सरकारच्या बाजूने अडचणी आणल्या गेल्याचा आरोप त्यांनी केला.

ते पुढे म्हणाले की आम्ही जेव्हा जेव्हा नोटीस द्यायचो आणि त्यावर चर्चेची मागणी करायचो, तेव्हा त्यांनी आम्हाला बोलू दिले नाही. ५२ वर्षात हे पहिल्यांदा पाहिले की जिथे सत्ताधारी पक्षाचे लोकच संसद चालू देण्यात अडथळे निर्माण करतात.

राज्यसभा सभापतींनी घेतली दिग्विजय सिंह यांची फिरकी, राज्यसभेत गदारोळ, कामकाज तहकूब

आमचा एकच मुद्दा होता की अदानीला इतकं महत्त्व का दिलं जातं आहे? अवघ्या अडीच वर्षात अदानींची संपत्ती १२ लाख कोटी कशी झाली? त्यांनी सरकारचा पैसा आणि मालमत्ता विकत घेतली आहे. पंतप्रधान मोदी एकाच व्यक्तीला इतक्या गोष्टी का देत आहेत? असा प्रश्न राहुल गांधींनी लोकसभेत केला होता. त्याला उत्तर देण्यासाठी तुम्ही जेपीसीला का घाबरता? असा प्रश्न खर्गे यांनी विचारला.

विरोधी पक्षांना सर्व कागदपत्रे तपासण्याची संधी मिळते आणि पारदर्शकता ठेवली जाते. मात्र सरकारने ते नाकारले आणि त्यावर ते काहीही बोलायला तयार नाहीत. या अधिवेशनात खऱ्या मुद्द्यावरून लक्ष वळवण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप त्यांनी सरकारवर केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube