राज्यसभा सभापतींनी घेतली दिग्विजय सिंह यांची फिरकी, राज्यसभेत गदारोळ, कामकाज तहकूब
नवी दिल्ली : अदानी समुहाने (Adani Group) फसवणूक करत शेअरच्या किमतीमध्ये फेरफार केल्याचा आरोप हिंडेनबर्ग रिसर्चने केला होता. त्यानंतर अदानी समुहाच्या भरभराटीला उतरती कळा लागली होती. अदानी प्रकरणावरून संसदेत विरोधक एकटवले होते. त्यांनी संयुक्त संसदीय चौकशी समितीची मागणी केली. दरम्यान, काल कॉंग्रेसने आपल्या सगळ्या खासदारांना संसदेत काळे कपडे घालून येण्याच्या सुचना केल्या केल्या होत्या. त्यानंतर आज कॉंग्रेसचे नेते दिग्विजय सिंह हे काळे कपडे घालून संसदेत आले होते. यावरून राज्यसभा सभापती जगदीप धनकड (Jagdeep Dhankad) यांनी दिग्विजय सिंह ( Digvijay Singh) यांची चांगलीच फिरकी घेतली.
हिंडनेबर्गने अदानी समूहाबद्दल प्रकाशित केलेल्या रिपोर्टची जेपीसी चौकशी करावी, या मागणीवर विरोधक ठाम आहेत. त्यामुळं काल कॉंग्रेसने आपल्या सगळ्या खासदारांना संसदेत काळे कपडे घालून येण्याच्या सुचना केल्या केल्या होत्या. मात्र, कॉंग्रेसचे नेते दिग्विजय सिंह हे एकमेव काळे कपडे घालून संसदेत पोहोचले आहेत. यावरून राज्यसभा अध्यक्ष जगदीप धनकड यांनी दिग्विजय सिंह यांची चांगलीच फिरकी घेतली. लंडनमध्ये राहुल गांधींच्या वक्तव्यायावर भाजप खासदारांनी संसदेत चांगलाच गोंधळ घातला होता. त्यानंतर राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली. तेव्हापासून भाजप खासदार हे शांत आहेत. मात्र, आज संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा शेवटचा दिवस असून आजही लोकसभेनंतर राज्यभेत मोठा हंगामा झाला. राज्यसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांना जेपीसीचा मुद्दा उचलून धरला.
रोशनी शिंदे मारहाण प्रकरण : राज्य महिला आयोगाने ठाणे आयुक्तांना दिले आदेश…
राज्यसभा सभापतींनी कामकाज पुकारले. मात्र कॉंग्रेसने अदानींच्या चौकशीचा मुद्दा लावून धरला होता. यावेळी बोलतांना दिग्विजय सिंह यांनी सांगितले की, अदानी मुद्यावर देशाच्या सदनात कोणत्याही प्रकारची चर्चा होऊ नये, यासाठी सरकार प्रयत्न करते आहे. सरकारला वाटतं की, या मुद्यावर चर्चाच होऊ नये. मात्र, यावर चर्चा झाली पाहिजे. नेमकी अदानी यांना कोण पाठीशी घालतं, हे जनतेला कळायला हवं, असं ते म्हणाले. कॉंग्रेस सदस्यांनी यावेळी सदनात जोरदार घोषणाबाजी केली. जोरदार हंगामा आणि नारेबाजीनंतर सभापती जगदीप धनकडे हे कॉंग्रेससह दिग्विजय सिंह यांच्यावर नाराज झाले आणि त्यांनी दिग्विजय सिंह यांच्यावर खोचक टोलेबाजी केली. दरम्यान, अदानी-हिंडेबर्ग प्रकरणावर राज्यसभेत विरोधी पक्षांच्या खासदारांनी संयुक्त संसदीय समितीची (जेपीसी) मागणी करत जोरदार घोषणाबाजी केली. विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानं राज्यसभेचं काम 2 वाजेपर्यंत तहकुब करण्यात आलं.
जेपीसीची चौकशी करण्याच्या मुद्यावर ठाम असणाऱ्या कॉंग्रेसने इंतर 12 पक्षांसह लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज सायंकाळी ठेवलेल्या चहापानावरही बहिष्कार टाकला आहे.