सहावीतील विद्यार्थीनीवर ॲसिड हल्ला, नेमकं काय घडलं? मुलीची पहिली प्रतिक्रिया…
Ahilyanagar Acid Attack Case : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात सहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर अॅसिड हल्ला करण्यात
Ahilyanagar Acid Attack Case : अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात सहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर अॅसिड हल्ला करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. विद्यार्थिनी वडगाव पान शाळेतून घरी जात असताना अज्ञात तरुणाकडून अॅसिड हल्ला करण्यात आला. या धक्कादायक घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट पसरली असून आरोपीला अटक करण्यात यावी अशी मागणी होत आहे.
तर दुसरीकडे आता या प्रकरणात हल्ला झालेल्या मुलीने (Ahilyanagar Acid Attack Case) प्रतिक्रिया दिली आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, हल्ला झालेल्या अल्पवयीन मुलीवर लोणी येथे उपचार सुरु असून हल्ला करणारा आरोपी अनोळखी असल्याची प्रतिक्रिया पोलिसांना हल्ला झालेल्या अल्पवयीन मुलीने दिली आहे.
तर आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांकडून आणि ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. तर दुसरीकडे याच मागणीसाठी आज ग्रामस्थ (Sangamner) रास्ता रोको आंदोलन देखील करणार आहे. तर दुसरीकडे लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात मुलीवर उपचार सुरु असून तिची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. मुलीच्या उजव्या बाजूकडील डोळा व त्याच्या खालील भागावर मोठी इजा झाली असल्याची देखील माहिती मिळाली आहे. तर आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांनी विविध पथक स्थापन करुन सीसीटीव्हीच्या (CCTV) आधारे आरोपीचा शोध सुरु करण्यात आला आहे.
व्यवसायात मिळणार संधी, ‘या’ राशींना होणार फायदा; जाणून घ्या आजचा दिवस कसा राहणार ?
गुन्हा दाखल, तपास सुरु – रुपाली चाकणकर
तर या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. मुलीवर लोणी इथल्या रुग्णालयात उपचार सुरु असून मुलीचा चेहरा उजव्या डोळ्याचे बाजुने 7 टक्के भाजलेला आहे. मुलीचा जबाब, प्रत्यक्षदर्शीकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेज आधारे तपास करत असल्याची माहिती राज्य महिला आयोगाचे अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी दिली.
